LIVE NOW

LIVE : मुंबई, पुण्यानंतर दिल्लीतही रेकॉर्ड ब्रेक रुग्णवाढ; 24 तासांत 7437 नव्या केसेस

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | April 8, 2021, 10:13 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated April 8, 2021
auto-refresh

Highlights

10:13 pm (IST)

विक्रमगड तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रिव्हेरा सेंटरमधले ऑक्सिजन सिलेंडर संपले, 70 पेशंट‌्सना तात्पुरते छोटे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले, गेल्या 8 दिवसांपासून ऑक्सिजनचे मोठे सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत, 70 रुग्णांचा जीव टांगणीला, सेंटरला त्वरित ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध करून घ्या, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, शक्य तितके ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करू द्या, मुख्यमंत्र्यांचे शासकीय यंत्रणांना आदेश

9:36 pm (IST)

मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई, 12 रेमडेसिवीर इंजेक्शन जोगेश्वरी भागातून जप्त, रेमडेसिवीरसह एका आरोपीला अटक

 

9:29 pm (IST)

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं तांडव सुरूच
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 6,508 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 34 रुग्णांचा मृत्यू

 

8:58 pm (IST)

'देशात 11 ते 14 एप्रिल टीका उत्सव साजरा करा'
'45 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य'
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व राज्यांना आवाहन

8:37 pm (IST)

सावधान महाराष्ट्र ! कोरोनाचा धोका कायम
राज्यात दिवसभरात 56,286 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 36,130 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 376 रुग्णांचा मृत्यू
राज्यात सध्या 5 लाख 21,317 ॲक्टिव्ह रुग्ण

 

8:29 pm (IST)

सावधान ! पुण्यात कोरोनाची उच्चांकी वाढ
पुण्यात दिवसभरात 7010 नवीन रुग्ण
पुण्यात दिवसभरात 4099 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 43 रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील सध्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 48,939

8:28 pm (IST)

'कोरोना लढाईत महाराष्ट्र मागे नव्हता, राहणार नाही'
उद्धव ठाकरेंनी दिला पंतप्रधानांना ठाम विश्वास
कोरोना लढ्यात राजकारण आणू नका -मुख्यमंत्री
सर्व राजकीय पक्षांना समज द्यावी अशी विनंती
'राज्यात अधिक मोठ्या प्रमाणावर चाचण्या'
लसीकरणही करण्याची तयारी - उद्धव ठाकरे
'जादा लस पुरवठा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करा'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींकडे मागणी

7:57 pm (IST)

राजधानी पुन्हा बनतेय कोरोनाचा हॉटस्पॉट
दिल्लीत दिवसभरात 7,437 नवीन रुग्ण
दिल्लीत दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू

7:43 pm (IST)

मुंबईत दिवसभरात 8 हजार 938 रुग्ण
मुंबईत दिवसभरात 23 रुग्णांचा मृत्यू

7:26 pm (IST)

आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक
'रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळावा'
प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक - राजेश टोपे
'इंजेक्शनवरील एमआरपी कमी करावी'
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स