LIVE NOW

LIVE : अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य झटके, 19 किलोमीटर अंतरावर केंद्र

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | April 17, 2021, 10:18 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated April 17, 2021
auto-refresh

Highlights

10:18 pm (IST)

मुंबई - महापालिकेच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोनाबाधित रुग्णांचे प्राणवायू उपलब्ध असलेल्या ठिकाणी सुरक्षित स्थलांतर, प्राणवायू पुरवठा सुरळीत राखण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न; महापौर, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आयुक्तांसह संपूर्ण प्रशासनाचं सातत्यानं परिस्थितीवर लक्ष

10:02 pm (IST)

पुणे - ससूनमधील मार्डच्या डॉक्टरांचा संप स्थगित
प्रशासन 60 कंत्राटी डॉक्टरची भरती करणार
लेखी आश्वासनानंतर मार्ड डॉक्टरांचा संप मागे
आश्वासन न पाळल्यास पुन्हा संपावर जाणार
अत्यावश्यक सेवा वगळून सुरू केला होता संप

9:58 pm (IST)

राज्याला रेल्वेनं ऑक्सिजन पुरवठा होणार, रेल्वेनं दिली परवानगी, रेल्वेमधून ट्रक उतरण्यासाठी रॅम्पची मागवली माहिती, रेल्वेच्या सर्व विभागांना पाठवलं पत्र, रो-रो सर्व्हिसच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा, मालगाडीत थेट ट्रक, टँकर ठेवले जातील, रॅम्प असलेल्या ठिकाणी हे ट्रक, टँकर उतरतील; नाशिक, चिंचवड, कळंबोलीला रॅम्प तयार

9:28 pm (IST)

'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा दणका
पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या सोलापूर दौऱ्यावर
उद्या सकाळी 11 वा. घेणार प्रशासनाची बैठक
आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाची घेतली परवानगी
ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्सची उपलब्धता
रुग्णसंख्या, कोरोनाच्या स्थितीचा घेणार आढावा
पालकमंत्री अनुपस्थितीबाबत केले होते प्रश्न उपस्थित

8:57 pm (IST)

नितीन गडकरींच्या पुढाकाराला यश
विदर्भातच तयार होणार रेमडेसिवीर
वर्ध्याच्या 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला परवानगी 

8:30 pm (IST)

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4718 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 5387 कोरोनामुक्त
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 38 रुग्णांचा मृत्यू

 

8:13 pm (IST)

मुंबईत दिवसभरात 8 हजार 834 नवीन रुग्ण
मुंबईत दिवसभरात 6 हजार 617 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 52 कोरोना रुग्णांचा मृत्यू

 

8:09 pm (IST)

राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ
राज्यात दिवसभरात 67 हजार 123 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 56 हजार 783 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 419 कोरोना रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 81.18, मृत्युदर 1.59%
राज्यात सध्या 6 लाख 47,933 ॲक्टिव्ह रुग्ण

 

8:00 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 6006 नवीन रुग्ण
पुण्यात दिवसभरात 5609 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 75 रुग्णांचा मृत्यू
पुण्यातील दैनंदिन रुग्णवाढ पुन्हा 6 हजारांवर
दैनंदिन मृत्यूचा आकडाही पहिल्यांदाच 75 वर

8:00 pm (IST)

'राज्यातील कोरोना स्थितीला गांभीर्यानं घ्या'
एकनाथ खडसेंचा राज्य सरकारला सल्ला

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स