• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कोरोनाचा फटका, 'या' राज्यात लावला पेट्रोल-6 तर डिझेलवर 5 रुपये कोविड-19 सेस

कोरोनाचा फटका, 'या' राज्यात लावला पेट्रोल-6 तर डिझेलवर 5 रुपये कोविड-19 सेस

कर आणि सेस व्यतिरिक्त कोविड-19 सेस आकारणारं नॅगालँड हे देशातील पहिलं राज्य आहे.

 • Share this:
  गुवाहाटी, 29 एप्रिल : कोरोना व्हायरसचं देशभरात थैमानं एकीकडे सुरू असतानाच अनेक उद्योगधंदे आणि व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू महाग झाल्यानं सर्वसामान्यांना समस्या निर्माण होत आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर आता भाज्या आणि किराणानंतर पेट्रोल आणि डिझेलही महाग झालं आहे. याचं कारण म्हणजे त्यावर लावण्यात आलेला कोविड-19चा अतिरिक्त सेस. आसाममध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचे दर वाढवण्यात आले होते. आता त्यानंतर नॅगालँड सरकारनंही आपल्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर सेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनावर कोविड-19 सेस आणि टॅक्स असं दोन्ही वाढवणारं देशातील हे पहिलंच राज्य आहे. पेट्रोलवर प्रतिलिटर 6 तर डिझेलवर 5 रुपये सेस आकारण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी रात्री नॅगालँड सरकारकडून घोषणा करण्यात आली. हे वाचा-पुण्यात आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ, 24 तासात आढळले 122 कोरोना रुग्ण मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीपासून राज्यात सेसची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नॅगालँड टॅक्सेशन अॅक्ट 1967 कायद्यांतर्गत हा नवीन कर आकारला जाणार असल्याची घोषणा राज्यपाल यांनी केली आहे. इंधनावर असणारा कर त्यासोबत सेस आणि अतिरिक्त कोविड-19चा उपकरही आकारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित्त आयुक्तांनी दिली आहे. वाढलेल्या या दरामुळे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडणार आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबण्याचा नाव घेत नाही. केंद्रीय मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 हजारच्या जवळपास लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मागच्या 24 तासांत 1594 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. प्रशासनाकडून घरी राहण्याचं वारंवार आवाहन केलं जात आहे. तरीही लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन अनेक ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आधीच उद्योगधंदे ठप्प आणि आर्थिक अडचणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नॅगालँड सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडणाार असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. संपादन- क्रांती कानेटकर हे वाचा-लॉकडाऊनमुळे देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
  Published by:Kranti Kanetkar
  First published: