• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ...तर जुलैपर्यंत 21 लाख भारतीयांना होणार कोरोना, तज्ज्ञांनी केलं अलर्ट

...तर जुलैपर्यंत 21 लाख भारतीयांना होणार कोरोना, तज्ज्ञांनी केलं अलर्ट

अमेरिकेत सगळ्यात जास्त लोक रिकव्हर झाले आहेत. अशा रुग्णांची संख्या तिथे 20 लाखांपेक्षा जास्त आहे. पण जगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्णही अमेरिकेतच आहेत.

अमेरिकेत सगळ्यात जास्त लोक रिकव्हर झाले आहेत. अशा रुग्णांची संख्या तिथे 20 लाखांपेक्षा जास्त आहे. पण जगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्णही अमेरिकेतच आहेत.

कोरोनाबाधितांच्या आकड्यात आता भारतानं इराणला मागे टाकत पहिल्या-10 देशांमध्ये स्थान मिळवले आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 25 मे : भारत जगभरातील कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) हॉटस्पॉट असलेल्या देशांपैकी एक आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात सध्या 1 लाख 38 हजार 845 कोरोना रुग्ण आहेत. तर, 4 हजार 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात आता भारतानं इराणला मागे टाकत पहिल्या-10 देशांमध्ये स्थान मिळवले आहे. दरम्यान मिशिगन युनिव्हर्सिटी (University of Michigan) आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं (Johns Hopkins University) कोरोना मॉडेलद्वारे चेतावणी दिली आहे की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात 21 लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत सरकारच्या अडचणी वाढू शकतात. तर, लॉकडाऊनचे नियम आणखी कडक होऊ शकतात. मिशिगन युनिव्हर्सिटी ऑफ बायोस्टॅटिस्टिक्सचे आणि रोग तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी एजन्सी रॉयटर्सला याबाबत सांगितले. भारतातील परिस्थिती येत्या काळात आणखी गंभीर होऊ शकते, अशी माहिती तयार केलेल्या मॉडेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. भ्रमर मुखर्जी यांनी सांगितले की, भारतात अद्याप संसर्गाचे प्रमाण कमी झालेले नाही, सरकारी आकडेवारीनुसार भारतात कोरोनाची प्रकरणं 13 दिवसांनी दुप्पट होत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये शिथिल करण्यात आलेले नियम अडचण वाढवू शकतात. वाचा-कोरोनावर मात करण्यासाठी तुमच्याकडेही आहे लस, तज्ञांनी केला मोठा खुलासा वृत्तसंस्था रॉयटर्सचे म्हणणं आहे की संसर्गाच्या वाढीशी संबंधित या अंदाजांवर भारताच्या आरोग्य मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मुख्य म्हणजे देशभरातील एकूण रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण हे एकट्या मुंबई शहरात आहेत. वाचा-संसर्गाच्या 11 दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होणार नाही जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि मुखर्जी यांच्या टीमनं भारतातील आरोग्य सेवा आणि रुग्णालयात कमी बेड व व्हेंटिलेटरबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार सध्या भारतात रूग्णालयात सुमारे 7 लाख 14 हजार बेड आहेत, तर 2009 मध्ये ही संख्या सुमारे 5 लाख 40 हजार होती. संसर्गाच्या संख्येत पहिल्या 10 देशांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे. तर त्यानंतर ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की यांचा क्रमांक लागतो. वाचा-भारतासाठी सर्वात धोकादायक ठरले 24 तास, तब्बल 6977 नवीन रुग्णांची नोंद भारतासाठी सर्वात धोकादायक ठरले 24 तास देशात कोरोना विषाणूचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सहा हजारांहून अधिक प्रकरणं नोंदविली जात आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 138845 वर पोहोचली आहे. यापैकी 4021 लोक मरण पावले आहेत. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासात 6,977 नवीन प्रकरणं समोर आली आहे तर 24 तासांत 154 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 41.57 टक्के इतका आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: