निजामुद्दीन परिषदेमुळे धोका वाढला, मरकझशी संबंधित 150 पेक्षा अधिक जणांना कोरोना

निजामुद्दीन परिषदेमुळे धोका वाढला, मरकझशी संबंधित 150 पेक्षा अधिक जणांना कोरोना

या परिषदेत सहभागी झालेल्या लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 एप्रिल : दिल्लीतील (delhi) निजामुद्दीन परिषदेमुळे (nizamuddin) भारतातील कोरोनाचा (india coronavirus) धोका आता अधिकच वाढला आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेलेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. या परिषदेमुळे शेकडो लोकांना या व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एकट्या दिल्लीतच तब्बल 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, जे या परिषदेत सहभागी झाले होते, दिल्ली सरकारने तशी माहिती दिली आहे.

संध्याकाळपर्यंतची आकडेवारी पाहता मरकझशी संबंधितांच्या संपर्कात आलेल्या 154 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. यामध्ये  दिल्लीत 18 प्रकरणं होती, जी आता 53 झाली आहेत तर जम्मू-काश्मीरमध्ये 23, तेलंगणा, 20, आंध्र प्रदेश, 17, अंदमान-निकोबार 9, तामिळनाडू 65 आणि पद्दुचेरीमध्ये 2 कोरोनाव्हायरसचे रुग्ण आहेत.

हे वाचा - मरकजमध्ये सामील झालेले 50 जण मुंबईत आल्याने धोका वाढला, पोलिसांच्या टीमकडून शोध सुरू

देशातील विविध राज्यातील आणि परदेशातील नागरिकांनी या परिषदेला हजेरी लावली होती. त्यापैकी काही जणांनी इतर राज्यातील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. शिवाय सर्व जण आपापल्या राज्यात परतलेत. त्यामुळे या परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांची माहिती राज्य सरकारला देण्यात आली आहे. त्यांना शोधून त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना क्वारंटाइन केलं जातं आहे.

2 हजारहून अधिक लोकं जमले होते

राजधानी दिल्लीत 1 मार्च ते 15 मार्च या कालावधीत सुमारे 1830 जणं निजामुद्दीन भागातील परिषदेत सहभागी झाले होते. स्थानिक लोकही यात जोडले गेले तर ही संख्या जवळपास दोन हजारांपर्यंत पोहोचते. दिल्ली किंवा आसपासच्या भागातील सुमारे 500 लोक येथे जमले होते. या कार्यक्रमात श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, इंडोनेशिया, इराण यासह 16 देशांमधील लोक उपस्थित होते. त्याच वेळी, देशातील अनेक राज्यांमधून लोक आले होते. हे नागरिक निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या मागील तबलीग-ए-जमातच्या मुख्यालयात थांबले होते.

हे वाचा - महाराष्ट्रासाठी दिलासा! नव्या कोरोना रुग्णांचा आकडा घटला, मुंबईत धोका कायम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2020 08:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading