फरारी कारमधून फिरण्याचा शौक पडला महागात, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा VIDEO

फरारी कारमधून फिरण्याचा शौक पडला महागात, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा VIDEO

मध्य प्रदेशातील बडगाव इथे आतापर्यंत 60 जण कोरोनाग्रस्त आहेत. मागच्या 2 दिवसांत नवीन 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

  • Share this:

इंदूर, 26 एप्रिल : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाचं संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारवर पोहोचला आहे. वारंवार सांगूनही काही जण लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत नाहीत. अशा लोकांना पोलीस कुठे फटके देऊन तर कुठे उठाबशा काढण्याची शिक्षा देत आहेत. असाच प्रकार इंदूरमध्ये घडला आहे. फरारी घेऊन विनामास्क जाणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. या तरुणाला पोलिसांनी अडवलं आणि मास्क का घातला नाही याची विचारणा केली. तरुण उडवा उडवीची उत्तरं देत आहे हे पाहून पोलिसांनी त्याला उठाबशा काठायची शिक्षा दिली आहे.

मध्य प्रदेशातील बडगाव इथे आतापर्यंत 60 जण कोरोनाग्रस्त आहेत. मागच्या 2 दिवसांत नवीन 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात मागच्या 24 तासांमध्ये 1990 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात 824 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 5 हजार 803 रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे.

हे वाचा-धक्कादायक! केस कापायला गेले आणि कोरोना घेऊन आले, 6 जणाना लागण

हे वाचा-या प्लानिंगसह विमान उड्डाणासाठी तयार आहे मुंबई एअरपोर्ट, फक्त आदेशाची गरज

First published: April 26, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading