मुंबई, 29 एप्रिल : महुआच्या फुलांचा वापर आजपर्यंत फक्त दारू तयार केली जाते असं आपण ऐकलं आहे. कोरोनाविरुद्ध लढाईत सॅनिटायझरचा वापर महत्त्वाचा आहे. या सॅनिटायझरमध्ये 60 ते 70 टक्क्यांहून अधिक अल्कहोल असतं. आदिवासी पाड्यांवरील महिलांना दारूसाठी वापरण्यात येणाऱ्या महुआच्या फुलांपासून सॅनिटायझर तयार करण्यात आलं आहे. बाजारात एकीकडे सॅनिटायझरचा तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतीमुळे लोकांना घेणं शक्य होत नाही. बाजारात सॅनिटायझरची किंमत 300 रुपये असताना महुआपासून तयार करण्यात आलेल्या सॅनिटायझरची किंमत केवळ 70 रुपये आहे. 200 मिली बाटली ही बाजारात 70 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
कोविड-19च्या विरोधात प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गानं आपली लढाई लढत आहे. या युद्धात सॅनिटायझर हे महत्त्वाचं शस्त्र आहे. अलिराजपूर जिल्ह्यातील 10 आदिवासी महिलांच्या गटानं यूट्यूबवर सॅनिटायझर कसा तयार केला जातो हे पाहिलं आणि त्यातून त्यांना कल्पना सुचली. ज्या फुलांपासून दारू तयार केली जाते त्यापासून सॅनिटायझर तयार करावा ही युक्ती सुचली आणि त्यांनी कल्पना प्रत्यक्षात साकार केली. महुआपासून सॅनिटायझर बनवून लोकांना स्वस्त दराने विकण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे आरोग्य विभागानेही तपासणी करून हा सॅनिटायझर उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे.
हे वाचा-न्यूरोएंडोक्राइनचं निदान झाल्यावर हे होते इरफानच्या आयुष्यातील 6 भावुक क्षण
10 महिलांच्या गटानं महुआ इथून सॅनिटायझर बनवून स्थानिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून प्रथम त्याची चाचणी करण्यात आली. सर्व निकषांची पूर्तता करण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बाजारात आणण्यात आलं. हे सॅनिटायझर 200 मिलीग्रॅम सॅनिटायझर महुआ सॅनिटायझर 70 रुपयांना विकला जात आहे. या उत्पादनाला वैद्यकीय मान्यता मिळाल्यानंतर बाजारात आणलं आहे. हे सॅनिटायझर सेंद्रीय आहे यातून बरेच जंतू मरतात. यामध्ये तुरटी, कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने आणि गुलाब जल यामध्ये वापरण्यात आलं आहे. शाळा, बँका, सरकारी संस्थांमध्ये हे सॅनिटायझर देणार असल्याची माहिती या महिलांनी दिली आहे.
हे वाचा-लवकरच उलघडणार किम यांच्या तब्येतीचं रहस्य, अमेरिकेनं पाठवली 5 गुप्तचर विमानं
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.