धोका वाढला! कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, संख्या 31 वर
देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या 31 वर पोहोचली आहे.
मुंबई, 14 मार्च : राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या वाढली आहे. त्यातच आता एका टूर कंपनीसोबत परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तीच्या पाच नातेवाईकांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 31 वर पोहोचली आहे.
कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.
आज दिवसभरात राज्यातल्या पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या रुग्णांची संख्या 9 ने वाढली. बुलडाणा जिल्ह्यात एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे स्वॅब रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत आहेत.पूर्व आफ्रिकेत सापडलेला पहिला कोरोना रुग्ण मुंबईहून संसर्ग घेऊन गेला आहे.
Samples of four patients, one from Mumbai and three from adjoining areas, test positive for coronavirus: Civic officials
मुंबई आणि परिसरातून चार नव्या रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या देशात सर्वाधिक झाली आहे.
31 मार्चपर्यंत राज्यातल्या सगळ्या शाळा बंद
कोरोना व्हायरस (Coronavirus) राज्यातील सगळ्या शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढची सूचना मिळेपर्यंत 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.दहावी बारावीच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील. यापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
थिएटर, जिमही बंद
सर्व सरकारी कार्यक्रम, सांस्कृतिक सोहळे रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच दिले आहेत. राज्यातल्या काही शहरांमध्ये जिम आणि थिएटरही बंद ठेवण्यात आली आहेत. आदेश न पाळणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे.
कायदा लागू
कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वाढता धोका पाहता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोविड-19 ला आपत्ती घोषित केलं आहे. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाला 4 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय साथरोग प्रतिबंध कायदाही लागू करण्यात आला आहे.
सरकारने कोरोनाव्हायरसला आपत्ती (Notified Disaster) घोषित केलं आहे. ज्यामुळे कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मदत मिळू शकेल. राज्याच्या डिजास्टर रिस्पॉन्स फंडमार्फत (Disaster Response Funds - SDRF) मदत म्हणून निधी दिला जाईल. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपये मिळतील. यामध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आणि या रुग्णांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही कुटुंबाचा समावेश आहे.