Home /News /national /

कोरोनामुळे मृत्यू, कोट्यवधी संपत्ती पण शेवटच्या प्रवासात एकही नातेवाईक नाही

कोरोनामुळे मृत्यू, कोट्यवधी संपत्ती पण शेवटच्या प्रवासात एकही नातेवाईक नाही

कनौजिया यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरला होता. त्यामुळे बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

    इंदौर, 07 मे : मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे एका व्यवसायिकाचा मृत्यू झाला. वेदनादायक गोष्ट म्हणजे या व्यवसायिकाकडे कोट्यवधिंची संपत्ती आणि माणसं असूनही शेवटच्या क्षणी एकहीजण स्मशानभूमीपर्यंत खांदा द्यायला येऊ शकलं नाही. तर दोन्ही मुलांनी मोबाईलवरच वडिलांचं अंत्यदर्शन घेतलं. इंदौर इथले प्रतिष्ठीत हॉटेल व्यवसायिक शशी कनौजिया यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पत्नी आणि आईवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कनौजिया यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरला होता. त्यामुळे बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. इंदौर इथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या महू इथे त्यांचं घर आहे. शेवटच्या क्षणी त्यांचा मुलगाही पाहायला आला नाही. कोरोनाचा संसर्ग शरीरात जास्त प्रमाणात पसरल्यानं पार्थिव घरी नेण्यासाठी किंवा अंत्ययात्रा काढण्यासाठी डॉक्टरांनी मनाई केली. मुक्तीधाम इथे त्यांना मुखाग्नी देण्यासाठी केवळ एक कर्मचारी उपस्थित होता. हे वाचा-परप्रांतीय मजुरांच्या मदतीला धावून आला भाजप नेता, पुण्यात करत आहे 'पुण्या'चं काम कनौजिया कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शशी कनौजिया यांची पत्नी एमटीएच येथे रूग्णालयात दाखल आहे. धाकटा भाऊ हा अरबिंदो हॉस्पिटलमध्ये आहे, तर दुसऱ्या भावाला मंगळवारी चोईथाराम हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या आईवर महूच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतात दिवसेंदिवस कोरोना प्रसार वाढला आहे. आज कोरोनग्रस्तांचा आकडा 50 हजारहून अधिक गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनाबाधितांच्या संख्या 52 हजार 952 आहे. तर, आतापर्यंत 1783 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 35 हजार 902 आहे आणि आतापर्यंत 15 हजार 266 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र 15 एप्रिलपासून कोरोनोचा ग्राफ धक्कादायक पद्धतीनं वाढत आहे. हे वाचा-BREAKING:राज्यात कोरोनामुळे 5 पोलिसांचा मृत्यू तर 531 कर्मचाऱ्यांना लागण संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Madhya pradesh

    पुढील बातम्या