बापरे! टेस्ट केल्यानंतर गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, संपूर्ण शहर हादरलं

बापरे! टेस्ट केल्यानंतर गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, संपूर्ण शहर हादरलं

रुग्णांनी टेस्ट केल्यानंतर खोटे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिला,यामुळे या रुग्णांबाबत माहिती मिळणे कठिण झाले आहे. सध्या पोलीस या रुग्णांचा शोध घेत आहे.

  • Share this:

लखनऊ, 03 ऑगस्ट : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून एका दिवसात 50 हजारांच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. यातच लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. लखनऊमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. या रुग्णांनी टेस्ट केल्यानंतर खोटे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिला,यामुळे या रुग्णांबाबत माहिती मिळणे कठिण झाले आहे. सध्या पोलीस या रुग्णांचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2290 कोरोना रुग्ण गायब झाल्याची शक्यता आहे. याती 1171 लोकांबाबत माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर 1119 रुग्ण अजूनही बेपत्ता आहेत. असे सांगितले जात आहे की 23 ते 31 जुलै दरम्यान या रुग्णांची चाचणी करण्यात आली.कोरोना टेस्ट केल्यानंतर हे रुग्ण गायब झाले. जेव्हा प्रशासनाने त्यांचे नाव आणि पत्ती यांची तपासणी केली,तेव्हा ही माहिती खोटी असल्याचे समोर आले.

वाचा-पुण्याची सीरम इंस्टिट्यूट देणार COVISHIELD, लवकरच जगाला मिळणार मेड इन इंडिया लस

पोलीस कमिश्नरने या रुग्णांना शोधण्याची जबाबदारी कोव्हिड-19 सर्व्हिंलस टीमला दिली आहे.आतापर्यंत 1171 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळ्यांविरुद्ध चुकीची माहिती दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कमिश्नर सुजीत पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रोज हजारोच्या संख्येने रुग्णांची तपासणी केली जाते. यात काही रुग्ण फॉर्मवर आपली खोटी माहित देत असल्याचे समोर आले आहे. सध्या अशा रुग्णांचा शोध घेतला जात आहे.

वाचा-कोरोना बाधित कुटुंबांना मोठा दिलासा, अभ्यासात आढळून आले नवे निष्कर्ष

70 हजार रुपयांचा दंड केला वसूल

दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने रविवारी कोव्हिड-19 प्रोटोकॉलचे उल्लंधन केल्याप्रकरणी 189 लोकांकडून तब्बल 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत 7179 लोकांकडून 27 लाख 13 हजा 667 दंड वसूल करण्यात आला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 3, 2020, 9:38 AM IST

ताज्या बातम्या