मुंबई, 09 मे : देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. या महासंकटामुळे देशात ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि 45 दिवस एका जागी थांबलेले मजूर आता आपल्या घरची वाट धरण्यासाठी धडपडत आहेत. केंद्र सरकारनं मजुरांसाठी खास ट्रेन सोडल्या आहेत. पण त्यासाठी आपला नंबर कधी लागले आणि खिशात पैसेही नाहीत त्यामुळे शक्य नसल्यानं अनेक मजुरांनी पायी जाण्याचा मार्ग निवडला.
पंजाबहून मजूर हरियाणामध्ये आपल्या घरी निघाले होते. अंबाला इथे रस्त्यावर मजूर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यामध्ये काहींच्या चपला तुटल्या तर काही मजुरांना पायात घालण्यासाठी चप्पल नव्हती. घरी तर जायचा निश्चय पक्का होता. हातात पैसे नाहीत पायात चप्पल नाही अशा परिस्थितीत रणरणत्या उन्हात घर गाठायचं होतं.
हे वाचा-पोलिसांना कोरोना होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ, गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्ण
परिस्थिती माणसाला शिकवते आणि त्यातून उभं राहायला भाग पडते. या मजुरांना मिळालेल्या पाण्याच्या पाटल्या आपण कधीही विचार करणार नाही पण या मजुरांनी आपल्या पायात बांधल्या आणि जिद्दीनं पुढचा प्रवास सुरू केला. या पाण्याच्या बाटल्या पायाच्या आकाराला बसतील की नाही याचाही विचार केला नाही. फक्त रणरणत्या उन्हात पाय भाजत आहेत त्यापासून वाचण्यासाठी अक्षरश: पाण्याच्या बाटल्या बांधून प्रवास केला आहे. हे चित्र फार विदारक आहे. पण परिस्थितीपुढे या मजुरांनीही आपली घरी जाण्याची जिद्द सोडली नाही.
हे वाचा-आता तुम्हीही घरच्या घरी करू शकता Corona tets, व्हायरस पसरण्याचा धोकाही कमी होणार
हे वाचा-कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 15 महिन्यांच्या चिमुकलीनं डॉक्टरांना दिलं Flying Kiss
हे वाचा-VIDEO : 'या' देशाच्या संसदेत राडा, खासदारांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी
संपादन- क्रांती कानेटकर