दिल्ली, 20 मे : कोरोनाला रोखण्यासाठी देशात चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आलं. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार कऱण्यासाठी सध्या आरोग्य कर्मचारी झटत आहेत. यामुळे इतर रुग्णांच्या उपचारात अडचणी येत आहेत. एका इंजेक्शनसाठी अनेक किलोमीटरची पायपीटही करण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. लॉकडाऊनमुळे दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या राजा कोटवाल यांना आलेल्या अडचणींची माहिती
न्यूज 18 हिंदीशी बोलताना दिली आहे.
राज यांची पत्नी मीना कोटवाली गर्भवती आहे. त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून अनेकवेळा अडचणींचा सामना करावा लागला. सध्या त्यांना डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. मीना यांना पहिल्या महिन्यापासून ज्या क्लिनिकमध्ये दाखवलं जात होतं ते क्लिनिक 22 मार्चला बंद झालं ते अजुन उघडलं नाही. डॉक्टरांचे वय जास्त असल्यांन त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून क्लिनिक सुरू केलं नाही. त्यामुळे पत्नीला काही गरज पडली तर फोनवरून सल्ला घेतला जात असे. दरम्यान तिला अँटी डी चे इंजेक्शन करण्याची आवश्यकता होती. तसंच अल्ट्रासाउंडचा रिपोर्टही घ्यायचा होता.
इंजेक्शनसाठी जवळचं क्लिनिक सुरू नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने राजा पत्नी मीना यांना घेऊन विनया भवन मॅटर्निटी रुग्णालयात गेले. त्यावेळी बरीच धावपळ करावी लागली. पत्नीला घेऊन पायी जावं लागलं होतं. कोणत्याही वेळी डॉक्टरांची मदत लागू शकते अशा वेळी आम्ही धावपळ करत होतो असं राजाने सांगितलं. कोरोनाचे रुग्ण सरकारी रुग्णालयात असल्यानं तिथं पत्नीला घेऊन जाणं धोक्याचं होतं. तेव्हा 8 व्या महिन्यानंतर पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा विचार केला मात्र इतर रुग्णालयात खूप वाईट अनुभव आल्याचं राजाने म्हटलं.
हे वाचा : 63 वर्षीय महिला कोरोनाविरुद्ध जिंकली पण दुसऱ्या आजाराने हरवलं
राजाने अखेर पंडीत मदन मोहन मालवीय रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेवर उपचार सुरू होत्या. त्यांच्यासोबत राजा आणि त्याची पत्नी मीना गेले. मात्र तिथेही खूप भयानक अशी परिस्थिती होती. लोक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नव्हते. महिलांची लांबच लांब रांग लागली होती आणि गर्दीही झालेली असं राजाने सांगितलं.
हे वाचा : कोरोनाचा धोका कायम, खासगी हॉस्पिटल्समधले 80 टक्के बेड्स सरकारच्या ताब्यात - टोपे
एका सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला सांगितलं की, इथं कोरोनाचे रुग्णही येत आहेत. त्यातच गर्दी अधिक असल्यानं लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अवघड जातं आहे. त्यामुळे शेवटी राजाने एका बाजूला कसंबसं थांबून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. मात्र डॉक्टरांनी मीना यांना नीट तपासलं नसल्याचं राजाने म्हटलं. राजा म्हणाला की, ज्या महिलेला आठवा महिना सुरु होता तिला लांबूनच पाहिलं आणि एक महिन्यानं येण्यास सांगितलं. त्यानंतर प्रसूती वेदना होत असलेल्या महिलेला तर पिटाळून लावल्याचे धक्कादायक प्रकार घडले.
हे वाचा : मुख्यमंत्र्यांचा एका कॉलनंतर उपासमारीची वेळ आलेल्या धावपटूला शिवसैनिकांची मदत
राजा म्हणाला की, आमची कागदपत्रे घाई घाईत तपासली आणि औषधे लिहून दिली. त्यानंतर काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या. त्या करून जेव्हा पुन्हा डॉक्टरांना दाखवल्या तेव्हा त्यांनी आता इकडे येऊ नका असं सांगितलं. दोन तीन लोक एका बेडवर आहेत. मुलांची इम्युनिटी सिस्टिम वीक होईल. तुम्हाला शक्य होत असेल तर खाजगी रुग्णालयात जा असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
हे वाचा :
आपला माणूस ! शेकडो किमी दूर अडकलेल्या लोकांची अंगावर शहारे आणणारी 'घरवापसी'
सफदरजंग रुग्णालयात जाण्यासही त्यांनी सांगितलं होतं. मात्र तिथं कोरोनाचे रुग्ण असल्यानं मालवीय नगरमधील एका रुग्णालयात घेऊन गेलो. जिथं डिलिव्हरी होते आणि फक्त मुलांवरच उपचार होतो. आता इथंच सर्व करू. दोन महिन्यांच्या धावपळीनंतर आता वाटतंय की सगळं ठीक होईल असं राजाने सांगितलं.
हे वाचा :
फक्त पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक्सनी ठणठणीत झाले कोरोना रुग्ण; प्रशासनही हैराण मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.