Lockdown: 17 मे नंतर काय होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार

Lockdown: 17 मे नंतर काय होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार

सर्व प्रश्नांवर चर्चा या बैठकीत होणार असून 17 मेनंतरचा रोडमॅप तयार केला जाणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 10 मे: देशातला लॉकडाऊन संपायला आता केवळ 7 दिवस रहिले आहेत. देशातला लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविण्यात आला होता. तो लॉकडाऊन 17 मेला संपणार असून त्यानंतर काय होणार हा प्रश्न देशभर विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (11 मे) देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. पंतप्रधानांची कोरोना प्रकरणा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतची ही 5वी व्हिडीओ कॉन्फरन्स आहे. त्यात कुठला निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, महत्त्वाच्या विभागांचे केंद्रीय सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता ही व्हिसी होणार आहे.

लॉकडाऊनमुळे देशातले सर्व व्यवहार ठप्प आहेत. लाखो मजुरांचं काम बंद झाल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झालाय. अजुनही हजारो मजूर रस्त्याने चालत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सर्व प्रश्नांवर चर्चा या बैठकीत होणार असून 17 मेनंतरचा रोडमॅप तयार केला जाणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

'मुस्लीम व्यक्ती पदार्थ तयार करत नाहीत', वादग्रस्त जाहिरातीप्रकरणी मालकाला अटक

मात्र लॉकडाऊनमध्येही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं 30 एप्रिल रोजी देशातील सर्व जिल्ह्यांची एक लिस्ट जारी करण्यात आली होती.

यात 130 जिल्हे रेड, 284 ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोन करण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही आठवड्यांमधील आकड्यांनी सरकारची चिंता वाढली आहे. सरकारच्या वतीनं ग्रीन झोन असलेल्या परिसरात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे.

कोरोना हरणार, भारत जिंकणार; व्हायरसवर मात केलेल्या रुग्णांमुळे आशा पल्लवित

मात्र ग्रीन झोन असलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये संक्रमणाची नवीन प्रकरणं दिसत आहेत. दिल्लीतील एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांनी येत्या काही दिवसांत ग्रीन झोनचं रेड झोन होतील, अशी शक्यता वर्तवली आहे. संक्रमणाची सर्वात जास्त प्रकरणे त्रिपुरातील ग्रीन झोन जिल्ह्यांमधून समोर आली आहे. त्यानंतर ओडिशातील कित्येक राज्यांमध्ये नवीन प्रकरणे मिळाली आहे. पंजाबमध्येही अशीच परिस्थिती आहे.

 

First published: May 10, 2020, 3:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading