नवी दिल्ली, 10 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरूच आहे. आतापर्यंत 5 हजार 734 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासांत देशात 806 नवीन केसेस समोर आल्या आहेत. तर 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 6 हजार 412 झाली आहे. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत 199 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु यादरम्यान, एक चांगली बातमी समोर आली आहे. देशाततील जवळपास 400 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना संसर्ग झालेला नाही. कोरोनाचा संसर्ग देशभरात 62 जिल्ह्यातमध्ये आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. एकूण प्रकरणांपैकी 80 टक्के प्रकरणे केवळ 62 जिल्ह्यांमधीलच आहेत. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन व्हायरसचा प्रसार रोखत आहे. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन वाढविणे आणि कडक कारवाई करणं शक्य आहे.
दिल्ली, उत्तर प्रेदशातील अनेक जिल्ह्ये सिल केले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे वाचा-24 तासात दादरच्या शुश्रुषामधील रुग्णांना देणार डिस्चार्ज, रुग्णालय करणार सील?
ICMR रिपोर्टनुसार 5911प्रकरणांपैकी केवळ २ पॉझिटिव्ह प्रकरणे अशी आहेत, ज्यातील एक रुग्ण कोरोना रूग्णाच्या थेट संपर्कात होता. दुसरे प्रकरण आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित आहे. तर, 59 प्रकरणे अशी आहेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवास इतिहास नाही. म्हणजेच त्यांना देशभरात संसर्ग झाला आहे. ICMRचा पहिल्या अहवाल 14 मार्च रोजी आला होते. त्यावेळी कोरोना तपासणी केलेल्या लोकांची कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह नव्हती. त्यानंतर, 15 ते 21 मार्च दरम्यान तपासणी केलेल्या 106 पैकी केवळ 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 22 मार्च ते 28 मार्च दरम्यान झालेल्या 2877 रूग्णांपैकी 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्याचप्रमाणे दुसर्या चाचणीत असेही म्हटले आहे की कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 83.3 % रुग्ण 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. तर, 81.4% रुग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. ICMRच्या दुसऱ्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले आहे की मार्च 14च्या आधी केलेल्या SARI टेस्ट केलेल्या रुग्णांची संख्या 0 होती, आता हीच संख्या 2.6% वाढली आहे.
हे वाचा-ठाणेकरांनो आता बस करा! कोरोनाचा कहर झाल्यावर तुम्ही ऐकणार का?
संपादन- क्रांती कानेटकर