Home /News /national /

कुछ मीठा हो जाए! शुगर डाऊन झालेल्या आजोबांना पोलिसांनी घरी येऊन भरवला रसगुल्ला

कुछ मीठा हो जाए! शुगर डाऊन झालेल्या आजोबांना पोलिसांनी घरी येऊन भरवला रसगुल्ला

शरीरातील शुगर लेवल कमी झाल्यामुळे या आजोबांना अस्वस्थ वाटत होतं. त्यांनी पोलिसांनी यासंदर्भात फोन करून माहिती दिली.

    लखनऊ, 30 मार्च : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारहून अधिक गेली आहे. आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. लखनऊमध्ये पोलिसांनी एका आजोबांना घरी जाऊन गोड खायला दिलं. पोलिसानं स्वत:च्या हातानं त्यांना भरवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लखनऊ इथे वृद्ध दाम्पत्य घरात एकटच राहात होते. त्यांना अचानक त्रास होऊ लागला. शरीरातील शुगर लेवल कमी झाल्यामुळे या आजोबांना अस्वस्थ वाटत होतं. त्यांनी पोलिसांनी यासंदर्भात फोन करून माहिती दिली. पोलिसांनीही तातडीनं त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शुगर लेवल पुन्हा नॉर्मल होण्यासाठी आजोबांना रसगुल्ला स्वत:च्या हातानं खावू घातला. हे वाचा-कोरोना लॉकडाऊन-या 3 महिन्यात वीजबिल भरण्यास विलंब झाला तरी नाही भरावा लागणार दंड पोलीस आपल्या परिनं कर्तव्यदक्ष आहेत. अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दांड्यानं चोप देणाऱ्या या पोलिसांचं हे वेगळं रुपही पाहायला मिळालं. IFS सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. आतापर्यंत 2.3 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे तर 180 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. 600 हून अधिक लोकांनी लाईक केला आहे. सोशल मीडियावर युझर्सनी या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक केलं आहे. हे वाचा-बाप रे! COVID-19 कंट्रोल रूममध्ये आधी मागवले समोसे नंतर दिली पानाची ऑर्डर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या