कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज, मोदी सरकारच्या 7 मोठ्या घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेज, मोदी सरकारच्या 7 मोठ्या घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची 1 लाख 70 हजार 000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : कोरोनाच्या संकटाने देशाला धडक दिल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील जनतेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर गरीबांवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.

'कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बोलताना सांगितलं आहे. देशातील प्रत्येक गरिबापर्यंत मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार, असंही त्या म्हणाल्या. गरजूंच्या थेट खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होणार असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे

कोरोनाचं संकट, केंद्र सरकारच्या 7 मोठ्या घोषणा

1. पंतप्रधान गरीब कल्याण योजना - 80 कोटी लोकांना याचा फायदा देण्यात येणार आहे. या सर्वांना आता मिळत असलेल्या धान्यापेक्षा 5 किलो गहू / 5 किलो तांदूळ जास्त मिळतील. पुढील 3 महिन्यांसाठी प्रत्येकी 5 किलो धान्य 1 किलो डाळ दिली जाईल.

2. आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांची काळजी घेणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याचं कवच, 20 लाख कर्मचाऱ्यांना फायदा

3. उज्ज्वला लाभार्थ्यांना पुढील 3 महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलिंडर मिळतील, 8.3 कोटी बीपीएल कुटुंबांना लाभ होईल

4. 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या विधवांना आगामी दोन महिन्यांसाठी 1 हजार रुपयांची मदत दिली जाईल, 3 कोटी गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना लाभ होईल

5. देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकले जाणार : अर्थमंत्री

6. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली आहे. मजुरांच्या दैनंदिन वेतनात 200 रुपये वाढवण्यात आले आहेत.

7. 20 कोटी महिलांना दरमहा मिळणार 500 रुपये

First published: March 26, 2020, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading