Home /News /national /

शरीरातल्या रक्ताचा कोणता धर्म नाही हेच खरं, तुमचे डोळेही पाणावतील अशी कहाणी

शरीरातल्या रक्ताचा कोणता धर्म नाही हेच खरं, तुमचे डोळेही पाणावतील अशी कहाणी

'संकटकाळात शेजाऱ्यांची मदत करणं हाच खरा धर्म', मुस्लीम बांधवांनी अंत्ययात्रेत दिला खांदा

    मालदा, 10 एप्रिल : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. 5 हजार 8 हून अधिक रुग्ण भारतात आढळले आहेत. तबलिगी जमातच्या लोकांमुळे सांप्रदायिक वादाच वातावरण तयार होत असताना एक वेगळं हिंदू-मुस्लीम एकात्मतेचं उदाहरण समोर आलं आहे. द्वेष ना राग काही मनात न ठेवता मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू कुटुंबीयांना मदत केली आहे. पश्चिम बंगालमधील मालदा गावात ही घटना घडली. कोरोनाच्या महासंकटात शेजारी राहणाऱ्या मुस्लीम कुटुंबीयांनी मदत केली आहे. असं म्हणतात की कोणत्याही समस्येत जर मदतीला कोणी धावून येत असेल तर तो शेजारी. हा शेजारी पक्का आणि सख्खा असल्यासारखा असतो. टाइम्स दिलेल्या वृत्तानुसार गावात वृद्ध विनय साहा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर लॉकडाऊनदरम्या अंत्यसंस्कार कसे करावेत काहीच सुचेना. अशावेळी त्यांचे शेजारी असलेल्या मुस्लीम कुटुंबियांनी संपूर्ण अंतिम संस्काराची तयार केली आहे. साहा कुटुंबातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी केली इतकच नाही तर गावापासून बाहेर 15 किलोमीटर दूर असलेल्या स्मशानभूमीपर्यंत पार्शिवासाठी खांदाही दिला. देशात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढण्यास निजामुद्दीनचा कार्यक्रम जबाबदार असल्याच्या चर्चा होत असताना मात्र मालदा इथे हिंदू-मुस्लीम एकात्मतेचं दर्शन घडलं आहे. हे वाचा-'मुलांना जवळ घेण्यासाठी जीव तुटतो पण...', कोरोना पॉझिटिव्ह नर्स आईची कहाणी या गावात साहा फक्त एकच हिंदू कुटुंब राहात आहे. बाकी शंभरहून अधिक मुस्लीम कुटुंब राहतात. मृत विनय साहा यांच्या मुलानं दिलेल्या माहितीनुसार या परिसरात आम्ही एकटं हिंदू कुटुंब असूनही आम्हला कधीच एकटं नाही वाटलं. कोरोनाच्या महासंकाटतही लॉकडाऊनदरम्यान त्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केल्याचं मुलानं सांगितलं. एवढं नाही तर वडील गेल्यानंतर त्यांच्या अंत्य संस्काराची सगळी व्यवस्था करण्यापासून ते खांद्या देण्यापर्यंत त्यांनी आम्हाला मदत केली. या घटनेनं पुन्हा एकदा हिंदू मुस्लीम एकात्मतेचा संदेश दिला आहे. हे वाचा-पोस्टाच्या या योजनेचा प्रीमियम भरण्याची मुदत वाढवली,13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, West bengal

    पुढील बातम्या