गोंडा, 09 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार पसरला आहे. प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 21 दिवस लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील गोंडा इथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेनं सर्वजण हैराण झाले आहेत. माहेरी गेलेली पत्नी लॉकडाऊनमुळे अडकली आणि पुन्हा येऊ शकली नाही. याचं दु:ख झालं आणि त्या नैराश्येतून न राहून अखेर तरुण आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील ठाणे कोतवाली नगर परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मागच्या काही दिवसांपूर्वी या तरुणाची पत्नी आपल्या माहेरी गेली होती आणि लॉकडाऊनमुळे ती पुन्हा येऊ शकत नव्हती. ती माहेरीच अडकली होती. आपल्या पत्नीचा विरह सहन न झाल्यानं तरुणानं नैराश्येतून आत्महत्या केली आहे.
हे वाचा-धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजीचा वाद जीवावर बेतला, एका वृद्धाला जागीच केलं ठार
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यांमधील हॉटस्पॉट भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री 12 ते 15 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत हे भआग सील करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने हॉटस्पॉट क्षेत्रावर पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये लखनौ, आग्रा, गाझियाबाद, गौतम बुध नगर, कानपूर, वाराणसी, शामली, मेरठ, बरेली, बुलंदशहर, फिरोजाबाद, महाराजगंज, सीतापूर आणि सीतापूर सहारनपूर जिल्ह्याची नावं आहेत.
हे वाचा-मॉब लिंचिंगचा गंभीर प्रकार, कोरोनाच्या संशयावरून लाथा-बुक्क्यांनी तरुणाची हत्या
संपादन- क्रांती कानेटकर.