गाझियाबाद, 30 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक लग्न पुढे ढकलावी लागली आहेत. काही ठिकाणी नियमांचं पालन करून लग्न पार पडली. पण उत्तर प्रदेशात त्यापेक्षा वेगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजी आणि रेशन आणायला जातो सांगून बाहेर पडलेला तरुण थेट घरी लग्न करून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजी आणि रेशन आणण्यासाठी बाजारात गेलेला तरुण थेट घरी सून घेऊन आला. ही घटना उत्तर प्रदेशातील साहिबाबाद परिसरात घडली आहे. हा संपूर्ण प्रकार काय हे तरुणाच्याही आईला कळलं नाही. आईलाही आश्चर्याचा धक्का बसला कोणतीही पूर्वकल्पना न देता असा काही प्रकार घडल्यानं ती पाहातच राहिली. तरुण प्रेयसीसोबत लग्न करून घरी घेऊन आला होता. संतप्त मुलाच्या आईने वधूला तिच्या घरात जाण्यापासून रोखले. यानंतर संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.
Ghaziabad: Mother denied entry to son who had gone out to purchase groceries&returned after marrying a woman in Sahibabad area. The man says, "We performed our marriage in a temple today & priest said that he would help us get marriage certificate once #lockdown is lifted." pic.twitter.com/9YqyKcoEaR
पोलीस ठाण्यात तरुणाच्या आईनं संपूर्ण प्रकार सांगितला. किराणा आणण्यासाठी गेलेला मुलगा कसा लग्न करून आला हे सांगितलं. लॉकडाऊनचं उल्लंघन आणि विरोधात जाऊन लग्न करणाऱ्या मुलाला घरात न घेण्याचा निर्णय त्याच्या आईनं घेतला होता. संपूर्ण प्रकार पोलिसांनी ऐकल्यानंतर दाम्पत्याला भाड्यानं घर घेऊन राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. तरुणाच्या म्हणण्यानुसार एक महिन्यापूर्वीच दोघांनी हरिद्वारमध्ये लग्न केलं. मात्र लग्न झाल्याचं कोणालाही माहीत नव्हतं. अचानक आणलेल्या या नवीन वधूला घरात घेण्यासाठी तरुणाच्या आईनं ठामपणे नकार दिला आहे.