मुंबई, 9 जून : चीनमधून कोरोना व्हायरस नावाचं संकट जगाच्या कानाकोपऱ्यात धडकलं आणि सर्वांचं जीवनच बदलून गेलं. कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी स्थिती जगभारात दिसू लागली. दिवस-रात्र धावणारे मोठ-मोठ्या शहरातील रस्ते अचानक ओस पडले. जीवनाच्या संघर्षात सतत धावणारा माणूस अचानक घरात अडकून पडला. मुंबई आणि दिल्लीतील स्थितीही काही वेगळी नव्हती. मात्र काही महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता काहीसं चित्र पालटू लागलं आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशातील चित्र कसं बदलत आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. एक व्यक्ती माकडांना घेऊन आपल्या दुचाकीवरून जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुचाकीवरील माकडेही पुन्हा सुरू झालेल्या जगाचा आनंद घेताना दिसत आहेत.
Life returns to normal. EVERYONE is back at work, at least in Delhi. Ramu and Basanti have made the best of spare time and expanded their family too! #reopening #unlock @CNBC_Awaaz @CNBCBajar @hemant_ghai pic.twitter.com/vt8hlxuDBe
— Shail Bhatnagar (@shail_bhatnagar) June 9, 2020
दरम्यान, केंद्र सरकारनं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव न झालेल्या राज्यांमध्येही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि मिझोराम या दोन राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवला असून, क्वारन्टाइनचा अवधी 21 दिवस केला आहे.