मराठी बातम्या /बातम्या /देश /

Tik Tok ची कमाल! 2 वर्षांपूर्वी हरवलेला बाप लॉकडाऊनमध्ये सापडला

Tik Tok ची कमाल! 2 वर्षांपूर्वी हरवलेला बाप लॉकडाऊनमध्ये सापडला

एका व्हिडीओमुळे वृद्ध व्यक्तीला घर आणि मुलाला आपले हरवलेले वडील मिळाल्याची घटना समोर आली आहे.

एका व्हिडीओमुळे वृद्ध व्यक्तीला घर आणि मुलाला आपले हरवलेले वडील मिळाल्याची घटना समोर आली आहे.

एका व्हिडीओमुळे वृद्ध व्यक्तीला घर आणि मुलाला आपले हरवलेले वडील मिळाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

भद्रादी, 29 मे : गेल्या काही दिवसांपासून वादात असलेलं टिकटॉक चक्क देवदूत बनल्याचं समोर आलं आहे. एका टिकटॉकवरील व्हिडीओमुळे तब्बल दोन वर्षांनंतर बेघर झालेल्या 55 वर्षीय वृद्ध व्यक्तीला पुन्हा त्याचं घर मिळालं आहे. लॉकडाऊनमध्ये एका व्हिडीओमुळे वृद्ध व्यक्तीला घर आणि मुलाला आपले हरवलेले वडील मिळाल्याची घटना समोर आली आहे.

तेलंगणा इथल्या कोठागुडमधील रोद्दम पेद्दीराजू या तरुणासाठी टिकटिक व्हिडीओ देवदूतासारखा धावून आल्याची माहिती मिळाली आहे. एप्रिल 2018 रोजी वडील कामाच्या शोधात शेजारच्या गावात जातो असं सांगून जे बाहेर पडले ते पुन्हा परतलेच नाहीत. रोद्दमनं त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र काहीच थांगपत्ता न लागल्यानं अखेर आशा सोडली. पण एका व्हिडीओनं त्यांची भेट पुन्हा वडिलांना करून दिली.

हे वाचा-मुंबईकडे येणाऱ्या गाडीचा भीषण अपघात, तरुणीनं जागीच सोडला जीव तर चिमुरडी बचावली

पंजाबच्या लुधियाना इथे कॉन्स्टेबल अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनदरम्यान गरजुंना मदत करतानाचा एक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 हजार किती दूर तेलंगणात रोद्दम पर्यंत पोहोचला आणि त्याला आपले वडील दिसले. 2 वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या बाप-लेकाची या व्हिडीओमुळे पुन्हा भेट झाली.

मिळेलेल्या माहितीनुसार रोद्दमचे वडील 2 वर्षांपूर्वी कामासाठी निघाले होते. त्यांना ट्रकमध्ये झोप लागल्यानं उतरायचं लक्षात आलं नाही.

ट्रक ड्रायव्हरनं जेव्हा उठवलं आणि उतरवलं त्यानंतर त्यांना आपण चुकल्याचं लक्षात आलं. भाषा समजत नाही आणि शिक्षण नसल्यानं त्यांना कुणाला काही नीट सांगताही येत नव्हतं. पंजाबच्या लुधियाना इथे ते रस्त्याच्या ब्रिजखाली राहात होते. लॉकडाऊनमध्ये जेव्हा पोलीस कॉन्स्टेबलनं त्यांना खाण्यासाठी मदत केली तेव्हा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि ताटातूट झालेल्या रोद्दम आणि त्याच्या वडिलांची भेट होणं शक्य झालं.

हे वाचा-देशाला लवकरच मिळणार कोरोनावर लस, पण शास्त्रज्ञांना सतावत आहे वेगळीच चिंता

हे वाचा-भारतात कोरोनाने मोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड, 24 तासांत नव्या रुग्णांचा कहर

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Panjab, Telangana, Tik tok, Viral video.