मराठी बातम्या /बातम्या /देश /

जिद्दीला सलाम! घरात नेटवर्क नाही म्हणून छतावर बसून केला क्लास

जिद्दीला सलाम! घरात नेटवर्क नाही म्हणून छतावर बसून केला क्लास

नेटवर्कला स्पीड मिळावा यासाठी ती घराच्या छतावर जाऊन बसली आणि तिने पूर्ण क्लास तिथून अटेंड केला.

नेटवर्कला स्पीड मिळावा यासाठी ती घराच्या छतावर जाऊन बसली आणि तिने पूर्ण क्लास तिथून अटेंड केला.

नेटवर्कला स्पीड मिळावा यासाठी ती घराच्या छतावर जाऊन बसली आणि तिने पूर्ण क्लास तिथून अटेंड केला.

    कोट्टकल, 06 जून : देशभरात कोरोनामुळे शाळा-महाविद्यालयांना अद्यापही सुट्टी आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन क्लास घेण्यात येत आहेत. परंतु कुठे अपुऱ्या सुविधा किंवा गैरसोयीमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासला हजर राहाणं शक्य होत नाही. पण शिकण्याची जिद्द आणि त्यासाठी असणारी एका विद्यार्थीनीची धडपड पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. केरळमध्ये नुकतच मान्सूनचं आगमन झालं. त्यामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे रेंज नाही किंवा लाइट नाही अशी अनेक संकट येत असताना विद्यार्थीनीनं चक्क नेटवर्कला प्रॉब्लेम येत असल्यानं घराच्या छतावर बसून क्लास अटेंड केल्याची माहिती मिळत आहे. या मुलीचा छतावर क्लास अटेंड करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे वाचा-लग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट? काय होत आहे ट्रेंड द हिंदू ने दिलेल्या वृत्तानुसार केरळमध्ये कोट्टकलजवळ राहणाऱ्या नमिता नारायण हिच्या घरी नेटवर्कची समस्या होती. नेटवर्कला स्पीड मिळावा यासाठी ती घराच्या छतावर जाऊन बसली आणि तिने पूर्ण क्लास तिथून अटेंड केला. नमिता BA इंग्लीशचे शिक्षण घेत असून ती तिसऱ्या वर्षात शिकत आहे. तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका खाजगी सर्व्हिस प्रोव्हायडरनं तिची इंटरनेटची समस्या सोडवण्यासाठी मदत केली आहे. माझी समस्या सोडवल्याबद्दल मी आभारी आहे. मला आता घरी बसून आणखीन चांगला अभ्यास करता येईल पण माझ्या प्रमाणे असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना इंटरनेटची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी क्लासला येऊ शकत नाहीत असंही नमितानं यावेळी सांगितलं आहे. कोट्टकलचे आमदार सय्यद अबिद हुसेन यांनी नमिताची भेट घेऊन तिच्या या जिद्दीचं आणि प्रेरणेचं कौतुक केलं आहे. हे वाचा-अमिताभ-आयुष्मान यांच्या चित्रपटावर संकट; लेखिकेवर संहिता चोरल्याचा आरोप संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या