वडिलांचा मृतदेह होता अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत, जिल्हाधिकारी मुलगा काम पूर्ण करूनच पोहोचला घरी

वडिलांचा मृतदेह होता अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत, जिल्हाधिकारी मुलगा काम पूर्ण करूनच पोहोचला घरी

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अनेक कठीण प्रसंग येत आहेत. कुटुंबावर संकट आल्यानंतरही कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावताना दिसत आहेत.

  • Share this:

कटक, 08 एप्रिल : कोरोनाविरुद्ध संपूर्ण देश लढत आहे. देशात लॉकडाउन असताना रस्त्यावर पोलीस सतर्क आहेत तर रुग्णालयात डॉक्टर,नर्स रुग्णांची सेवा करत आहेत. याशिवाय प्रशासकीय अधिकारी अत्यावश्यक सेवा नागरिकांना पुरवण्यासाठी दक्ष आहेत. घरच्या लोकांपासून दूर राहून हे लोक झटत आहेत. यात अनेक कठीण प्रसंग अधिकारी, कर्मचारी यांच्यावर येत आहेत. कुटुंबावर संकट आल्यानंतरही कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावताना दिसत आहेत.

ओडिसातील कटकचे जिल्हाधिकारी भवानी शंकर चैनी यांनीही आपलं दुख: बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य दिलं आहे. कुटुंबावर संकट कोसळलं असताना त्या वेळी घरात त्यांची गरज असताना ते देशासाठी कर्तव्य बजावत आहेत. कटक जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी ते महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. याच वेळी त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. तरीही सुट्टी न घेता काम सुरूच ठेवलं आहे.

केंद्रीय मंत्र्याचं अख्खं कुटुंब शिवतंय कोरोना योद्ध्यांसाठी सुरक्षा मास्क

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भवानी शंकर यांचे वडील दामोदर चैनी हेसुद्धा अधिकारी होते. मंगळवारी त्यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं. तेव्हा भवानी शंकर हे ड्युटीवर होते. कटकमध्ये कोरोनाशी संबंधित आवश्यक त्या सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात गुंले होते. यावेळी घरी न येता त्यांनी काम पूर्ण केलं.

पाहा VIDEO : कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि तिच्या मुलीचे अश्रू पाहून डोळ्यात येईल पाणी

ओडिसा सरकारकडून कोरोना व्हायरसची माहिती देणाऱ्या प्रवक्त्यांनी भवानी शंकर यांचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, जेव्हा कुटुंब दुख:त होतं तेव्हा तिथं गरज असतानाही लोकांच्या सेवेला प्राधान्य दिलं. यातून त्यांनी एक आदर्श समोर ठेवला आहे.

हे वाचा : corona: आईच्या मृतदेहावर प्रशासनानं केले अंत्यसंस्कार, मुलानं दुरूनच घेतलं दर्शन

संपादन  - सुरज यादव

First published: April 8, 2020, 8:55 PM IST

ताज्या बातम्या