Home /News /national /

कर्तव्यदक्ष कॅन्स्टेबलला सॅल्युट! हात फ्रॅक्चर असूनही आहे ऑनट्युटी

कर्तव्यदक्ष कॅन्स्टेबलला सॅल्युट! हात फ्रॅक्चर असूनही आहे ऑनट्युटी

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस अहोरात्र झटत आहेत. पोलीस आणि डॉक्टर त्यांच्यापेक्षा समाज आणि देशाला जास्त वेळ देत आहेत.

    भीलवाडा, 05 एप्रिल : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. आतापर्यंत जवळपास 3300 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. आतापर्यंत 204 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस अहोरात्र झटत आहेत. पोलीस आणि डॉक्टर त्यांच्यापेक्षा समाज आणि देशाला जास्त वेळ देत आहेत. हेच कारण आहे की सूरत येथील एमबीबीएस पासआउट डॉ. लव्हिना यांना उच्च शिक्षण घेण्यापेक्षा कोरोना पीडितांवर उपचार करणे जास्त महत्वाचं वाटत आहे. या कामात त्यांच्याबरोबर धोका असू शकतो, परंतु कोरोना पीडित व्यक्तींवर उपचार करताना बऱ्याच डॉक्टरांना देखिल कोरोनाची लागण झाली आहे. हे वाचा-राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत, काय आहे हॉस्पिटलची स्थिती, पाहा PHOTOS पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अभ्यासासाठी लवीना या घरी राहू शकत होत्या मात्र त्यांनीही कोरोनाग्रस्तांसाठी स्वत:ला वाहून घेण्याचं ठरवलं आहे. एप्रिलपासून त्या महत्मा गांधी रुग्णालयात त्या सेवा करत आहेत. त्यांची ही सेवा संपल्यानंतर त्या 14 दिवस होम क्वारंटाइन राहणार आहेत. तर दुसरीकडे एक पोलीस कॉन्स्टेबल आपला हात फ्रॅक्चर असतानाही ऑनट्युटी हजर राहिले आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, असाच एक कोरोना योद्धा कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार आहेत. ते आता समाजासाठी एक उदाहरण बनले आहेत. वास्तविक, 15 दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या दुचाकीला अपघात झाला आणि त्यात ते जखमी झाले होते. या अपघातात त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला. असे असूनही, ते आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. ते सुभाषनगर पोलिस ठाण्यात तैनात आहेत आणि ते आपले कर्तव्य चांगले पार पाडत आहे. हात फ्रॅक्चर झाल्यानं डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला. दरम्यान, शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला. अशा परिस्थितीत कर्तव्य देण्याची धर्मेंद्रांची इच्छा जागृत झाली. सुभाषनगर पोलीस अधिकारी नवनीत व्यास आणि इतर अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य बजावण्याची विनंती केली होती. त्यानंतर ते कामावर आले. हे वाचा-पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर इंदुरीकर महाराजांनी लिहिलं पत्र, म्हणाले...
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या