लढा कोरोनाशी! 9 वाजता 9 मिनिटं दिवा पेटवण्याआधी 'ही' काळजी घ्या

लढा कोरोनाशी! 9 वाजता 9 मिनिटं दिवा पेटवण्याआधी 'ही' काळजी घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना रात्री 9 वाजल्यापासून 9 मिनिटांपर्यंत वीज बंद कऱण्याचं आवाहन केलं असून दिवे किंवा बॅटरी लावण्यास त्यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी एकता आणि सामुहिक ताकद दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आवाहन देशातील नागरिकांना केलं आहे. त्यात आज (रविवार) रात्री 9 वाजल्यापासून 9 मिनिटांपर्यंत वीज बंद कऱण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. या काळात दिवे किंवा बॅटरी लावण्यास त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान हे करत असताना लोकांनी काळजी घ्यावी असंही ते म्हणाले होते. लोकांनी यासाठी एकत्र येण्याची गरज नाही तर घराच्या बाल्कनीत किंवा दरवाजात उभा राहून दिवा लावा असं मोदींनी सांगितलं आहे.

लाइट अचानक सुरु किंवा बंद केल्यानं घरातील इलेक्ट्रिक उपकरणं खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळं एकाच वेळी लाईट बंद करू नका, तसंच सुरु सुद्धा करू नका.

नागरिकांनी घरात दिवे किंवा मेणबत्ती लावताना काळजी घ्यावी. घरात आग लागणार नाही याकडे लक्ष द्यावं. दिवा लावल्यानंतर तो तसाच ठेवण्यापेक्षा नीट अशा ठिकाणी ठेवा जिथं तो लवकर विझला नाही तरी आगीचा धोका नसेल.

घरातील लाइट म्हणजेच बल्ब, ट्यूब इत्यादी गोष्टी बंद करा. फ्रीज, कम्प्युटर, फॅन, एसी यांसारखी इलेक्ट्रिक उपकरणं बंद करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वीजेचा वापर अचानक कमी किंवा जास्त होणार नाही.

सध्या कोरोनामुळे हाताला सॅनिटायझर लावला जात आहे. दक्षता म्हणून आपण सॅनिटायझर लावत असलो तरी दिवे लावताना त्याचा वापर करू नका. सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असल्यानं ते पेट घेतं. त्यामुळे आग लागण्याचा धोका आहे.

हे वाचा : Lockdown मध्ये येत असलेला तणाव टाळण्यासाठी या सोप्या टिप्स वापरून पाहा

घरात दिवा किंवा मेणबत्ती नसेल तरी चालेल. तुम्ही मोबाइलचा फ्लॅशही सुरु करु शकता. दिवा, मेणबत्ती पेटवण्याआधी हात स्वच: धुवा. तसंच वीज घालवण्याआधी घरात लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्या. घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर ती सोबत असतील तर हात सोडून इतरत्र जाणार नाहीत हे पाहा.

हे वाचा : डास चावल्यानं होऊ शकतो कोरोना? वाचा काय सांगतात डॉक्टर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2020 07:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading