मजुरांच्या 'मदर इंडिया'! 85 वर्षांच्या 'या' आजी देतायत 1 रुपयांत इडली

मजुरांच्या 'मदर इंडिया'! 85 वर्षांच्या 'या' आजी देतायत 1 रुपयांत इडली

कोणाचीही मदत न घेता या या आजी दरदिवसाला 1 हजार इडली तयार करतात आणि स्वस्त दरात खाऊ घालतात.

  • Share this:

कोयंबटूर, 10 मे : देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांना टाळं लागलं आहे. मजुरांचं मोठं नुकसान झालं आहे. हातात पैसे नसल्यानं खाण्याची भ्रांत असलेल्या मजुरांसाठी 85 वर्षांच्या या अम्मानं 1 रुपयांत इडली देण्याचा घाट घातला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकजण आपल्या खिशात पैसे वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. बर्‍याच ठिकाणी लोक स्थलांतरित मजुरांना खायला घालत आहेत. तमिळनाडू इथे 85 वर्षांच्या आजीनंही आपल्या परीनं मजुरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

कोयंबटूर शहरापासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका गावातील 85 वर्षांच्या आजी मजुरांसाठी 1 रुपयांत इडली आणि चटणी विकत आहेत. आजच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून त्या 1 रुपयांत इटली चटणी विकण्याचा त्यांचा नित्यक्रम सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक दुकानं बंद झाली मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं तरीही या अम्मानं आपल्या इडली आणि चटणीचा दर कधी वाढवला नाही.

हे वाचा-परप्रांतीय मजुरांसमोर भाकरीचा प्रश्न! पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला महत्त्वपूर्ण

या आजी दरदिवसाला 1 हजार इडली तयार करतात. इडली आणि चटणी रोज त्या स्वत: करतात. त्यांच्या मदतीला कोणाही नाही त्या एकट्या हे सगळं करतात. इतर ठिकाणी 6 आणि 10 रुपये इडलीचा दर असतानाही त्या आपल्या हातानं इडली तयार करून त्या रोज लोकांना 1 रुपयात इडली खाऊ घालतात.

'कोरोनाच्या या महासंकटात सध्या परिस्थिती फार कठीण आहे. तरीही मी इडली 1 रुपयात देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक लोकांकडून मला यासाठी मदतही मिळते. मी एक रुपयांत इडली खाऊ घालून लोकांना मदत करेन'. असं या आजींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. एका अहवालानुसार 30 वर्षांपासून या आजी इथे इडली विकत आहेत. यातून नफा मिळवणं हा उद्देश नाही तर लोकांचं पोट भराव हा हेतू घेऊन इडली आणि चटणी 1 रुपयांत विकण्याचं काम सुरू केलं.

हे वाचा-VIDEO : लॉकडाऊनमध्ये खाण्याच्या शोधा घरी आला जंगली पाहुणा छतावर चढला आणि...

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 10, 2020, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading