चेन्नई, 02 जून : कोरोनाला रोखण्यासाठी देशात पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन (Lockdown-05) जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर आता अनलॉक 1.0 (Unlock-01) अंतर्गत काही राज्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. यात काही सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. याच अंतर्गत काही राज्यांनी सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तमिळनाडू (Tamilnadu) सरकारनं सलून खोलण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र यासाठी एक नियम जारी केला आहे. सलूनमध्ये (Salon) आलेल्या लोकांना आधार कार्ड दाखवणे सक्तीचं आहे. एवढेच नाही तर सलूनमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाल, पत्ता, फोन नंबर आणि आधार कार्ड नंबरची नोंद करणं अनिवार्य आहे.
1 जूनपासून सुरू झाले सलून आणि पार्लर
पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये सलून आणि पार्लरला काही राज्यांमध्ये परवानगी देण्यात आली. यासाठी राज्य सरकारच्या वतीनं वेगळी नियमावली तयार करण्यात आली आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्क आणि ग्लोव्ह्ज यांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी आधार कार्डची सक्ती केली आहे. तसेच, या नियमावलीचे पालन न केल्यास मालकावर किंवा ग्राहकांवर कारवाई केली जाणार आहे.
वाचा-लहान मुलांना Vitamin D सप्लिमेंट देणं योग्य आहे का?
50% स्टाफच करू शकणार काम
सलूनमध्ये केवळ 50% स्टाफला काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सलून मालकांना ग्राहकांसाठी डिस्पोजेबल अॅप्रन आणि चप्पलसाठी कव्हर ठेवणं बंधनकारक असणार आहे. जर ग्राहकाचे बील एक हजार रुपये असेल तर त्यात 150 रुपये डिस्पोजेबल अॅप्रनसाठी जास्तीचे द्यावे लागणार आहेत.
वाचा-कोरोनावरील उपचारासाठी 'हे' औषध धोकादायक, मृतांची संख्या आणखी वाढेल; WHOचा इशारा
वाचा-कोरोनाच्या संकटात आता आणखी एका व्हायरसची एण्ट्री, आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू