पैशांसाठी बापानं काळजाच्या तुकड्याचा केला सौदा, 4 महिन्यांच्या मुलीला 45 हजाराला विकलं

पैशांसाठी बापानं काळजाच्या तुकड्याचा केला सौदा, 4 महिन्यांच्या मुलीला 45 हजाराला विकलं

या प्रकरणी पोलिसांनी मुलीचा सौदा केल्या प्रकरणी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

कोकराझार, 23 जुलै : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक मजुरांचे हाल झाले. अनेक छोटे व्यवसाय आणि कामधंदे बंद झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत पैशांची चणचण भासणाऱ्या वडिलांनी चक्क काळजाच्या तुकड्याचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आसाममध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीने 4 महिन्यांच्या मुलीला पैशाअभावी 45 हजार रुपयांना विकले. ही घटना कोकराझार जिल्ह्यातील आहे. लॉकडाऊनमध्ये अडचणीत सापडलेल्या कुटुंबातील वडिलांनी आपल्या 4 महिन्यांच्या मुलीला विकल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

तीन मुलींचा बाप असलेल्या वडिलांसमोर लॉकडाऊन आणि कोरोनामुळे मोठं संकट उभं राहिलं. लॉकडाऊनमुळे मोलमजुरी बंद झाली. अनेक दिवस कसेबसे ढकलल्यानंतर बापालाही असह्य झालं आणि पैशांसाठी अखेर आपल्या पोटच्या गोळ्याचा त्यानं सौदा केला.

हे वाचा-30 दिवसात 22 भूकंप! भीतीपायी 'या' शहरातील लोकांनी सोडलं स्वत:च घर

या चिमुकलीचे वडिल मोलमजुरी करायचे. मागच्या 4 महिन्यांपासून एकही काम नसल्यानं दीपक ब्रह्मा या मजुरानं गुजरातमधून आसाममध्ये आपल्या मूळ गावी आला. जे हातात पैसे होते ते घरी येईपर्यंत संपले. त्यानंतर काही दिवस ढकलले मात्र दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी मुलीला विकलं याची माहिती स्थानिक एनजीओला मिळाली आणि हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

या प्रकरणी पोलिसांनी मुलीचा सौदा केल्या प्रकरणी वडिलांना आणि खरेदी करणाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात एजन्टचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 23, 2020, 4:56 PM IST

ताज्या बातम्या