15 वर्षीय मुलीच्या धैर्याला सलाम! जखमी वडिलांना घेऊन सायकलवरून 1200 किमीचा केला प्रवास

15 वर्षीय मुलीच्या धैर्याला सलाम! जखमी वडिलांना घेऊन सायकलवरून 1200 किमीचा केला प्रवास

गुरुग्राम ते बिहार वडिलांना डबलसीट घेऊन प्रवास केला आहे. तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून या मुलीनं पूर्ण केला.

  • Share this:

गुरुग्राम, 20 मे : कोरोना व्हायरसमुळे देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कोरोनाची भीती आणि लॉकडाऊनमध्ये काम गेल्यानं उपासमारी यामुळे अनेक परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी परतत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मजुरांचे हाल होताना, घरी जाण्यासाठी सुरू असलेली केविलवाणी धडपड दाखवणारे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळेल त्या वाहनानं तर कुणी पायी चालत आपल्या घरची वाट धरली आहे. असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 15 वर्षांची मुलगी आपल्या वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

ही 15 वर्षांची मुलगी गुरुग्राम ते बिहार वडिलांना डबलसीट घेऊन प्रवास केला आहे. तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून या मुलीनं पूर्ण केला. ज्योती कुमारी असे या मुलीचे नाव आहे. वडील मोहन पासवान यांच्या दुखापतीमुळे ज्योतीला त्याला बसून संपूर्ण ठिकाणी सायकल चालवावी लागली.

हे वाचा-मुंबईतून धक्कादायक बातमी, पोलिसांपाठोपाठ IAS-IPS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

ज्योती इयत्ता सातवी शिकते. तिचे वडील गुरुग्राम इथे ई-रिक्षा चालवायचे. लॉकडाऊनमुळे धंदा बंद झाला आणि ई-रिक्षा मालकाकडे जमा करावी लागली. तर पैसे संपल्यानं घर मालकानंही घर खाली करण्यासाठी दबाव आणल्यानं त्यांच्याकडे राहण्यासाठी छप्पर आणि खाण्यासाठी पैसे नव्हते. शेवटे एका ट्रक चालकाकडून काही पैसे उधार घेऊन त्यांनी सायकल खरेदी केली. 500 रुपयांमध्ये त्यांनी सायकल खरेदी करून घरी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासादरम्यान मागून कोणतेही वाहन धडकणार नाही ना याची सतत भीती वाटत राहायची. जखमी वडील आणि मुलीने 10 मे रोजी गुरुग्राममधून सायकलनं प्रवास सुरू केला. 16 मे रोजी ते दोघंही सुखरुप त्यांच्या घरी पोहोचले.

हे वाचा-गडचिरोली बंद! सृजनाक्काच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी जाळली 4 वाहनं

हे वाचा-Super Cyclone Amphan आज घेणार भयंकर रूप...8 राज्यांमध्ये हाय अलर्ट

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 20, 2020, 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading