Home /News /national /

भारताचा धोका वाढला! Coronavirus च्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत सरकारने दिली नवी माहिती

भारताचा धोका वाढला! Coronavirus च्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत सरकारने दिली नवी माहिती

भारत सध्या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) लोकल ट्रान्समिशन आणि अंशत: कम्युनिटी ट्रान्समिशनच्या (local transmission and limited community transmission) टप्प्यात आहे, असं सरकारनं म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 30 मार्च : भारतात (India) 24 तासांत तब्बल 92 कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) रुग्ण आढळून आलेत, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांचा आकडा आता 1071 वर पोहोचला आहे, तर एकूण मृतांची संख्या 29 झाली आहे. कोरोनाव्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचला की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे. भारतात आता कोरोनाव्हायरसचं अंशत: कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचं सांगितलं जातं आहे, त्यामुळे भारताचा धोका वाढला आहे. एकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारत सध्या कोरोनाव्हायरसच्या लोकल ट्रान्समिशन आणि अंशत: कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यात (local transmission and limited community transmission) आहे, असं म्हटलं आहे. म्हणजेच भारतातील कोरोनाव्हायरस दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्ये आहे. दरम्यान देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. राज्यात मुंबईनंतर पुण्यामध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनीदेखील कोरोनाव्हायरसचा अंशत: कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचा सूचक इशारा दिला आहे, ते म्हणाले, "कोरोनाव्हायरसचं अंशत: संक्रमण झालं आहे, त्यामुळे काळजी घ्या. घराबाहेर पडू नका" हे वाचा - FACT CHECK दफनाला बंदी? कोरोनाग्रस्त मृताच्या शरीरापासून व्हायरसचा धोका आहे का? इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने भारतात सध्या कोरोनाव्हायरसचं लोकल ट्रान्समिशनच आहे, यावर ठाम आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ICMRच्या एपिडेमिओलॉजी अँड कम्युनिकेबल डिसीजचे प्रमुख रमण आर. गंगाखेडकर यांनी सांगितलं, "भारतात सोशल ट्रान्समिशन सुरू झालं असं म्हणण्याइतपत फारसे पुरावे नाहीत. अशी काही मोजकीच प्रकरणं आहेत, जिथं रुग्णाला व्हायरसची लागण नेमकी कुठून आणि कशी झाली हे समजलेलं नाही. मात्र अशा रुग्णांचा आकडा इतका नाही, ही आपण व्हायरस इतक्या झपाट्याने पसरतो आहे, असं म्हणू शकतो. आम्ही सध्या गंभीर अशी श्वसन समस्या असलेल्या सर्व रुग्णांची चाचणी करत आहोत. मात्र नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही" कोरोनाव्हायरसचे एकूण चार टप्पे आहेत, पहिला टप्पा म्हणजे कोरोनाची प्रकरणं असलेल्या देशांमधून आलेल्या नागरिकांना व्हायरसची लागण. दुसरा टप्पा म्हणजे परदेशातून या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना व्हायरसची लागण, ज्याला लोकल ट्रान्समिशन म्हटलं आहे. तिसरा टप्पा म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशन ज्यामध्ये कोरोनाव्हायरस रुग्णाला व्हायरसची लागण कशी आणि कुठून झाली याचा स्रोत सापडत नाही. चौथा टप्पा म्हणजे एपिडेमिक, या टप्प्यात व्हायरस इतक्या झपाट्याने पसरतो की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. हे वाचा - सावधान! स्टेज 3 चा Coronavirus आहे महाभयानक, तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी होईल अवस्था
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या