• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार - मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार - मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

देशभरात Coronavirus ने थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्र आणि देशातले यासंबधीचे ताजे अपडेट्स आणि लेटेस्ट न्यूज LIVE

 • News18 Lokmat
 • | March 24, 2020, 23:37 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  23:18 (IST)

  अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार - मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

  दुकानांमध्ये गर्दी करू नका, अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील, असं स्पष्टीकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पण अनावश्यक बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल.
  घराबाहेर पाऊल टाकाल तर संकट घरात पाऊल टाकेल, असं ठाकरे म्हणाले.

  उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह करून लोकांशी संवाद साधला.

  20:26 (IST)

  पंतप्रधान मोदी LIVE

  केंद्र सरकारने 15000 कोटी कोरोनाव्हायरसच्या संकटासाठी दिले आहेत. मेडिकल आणि पॅरामेडिकल ट्रेनिंगचं काम करावं लागेल.

  20:25 (IST)

  पंतप्रधान मोदी LIVE

  केंद्र सरकार राज्य सरकारांबरोबर गरिबांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सगळे प्रयत्न आपण करत आहोत. पण आयुष्य वाचवण्यासाठी जे आवश्यक आहे, त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायलाच हवी. आरोग्य सेवा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

  20:24 (IST)

  पंतप्रधान मोदी LIVE

  तुमच्या आरोग्याची काळजी घेत, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर, मेडिकल सेवा देणारे कर्मचारी, मीडिया, पोलीस यांचा विचार करा. एखाद्याच्या चुकीमुळे आणि बेपर्वाईमुळे सगळ्यांचं आयुष्य धोक्यात येईल.

  20:21 (IST)

  'जान है तो जहाँ है!' हात जोडून पंतप्रधान मोदींनी केली कळकळीची विनंती

  20:20 (IST)

  पंतप्रधान मोदी LIVE

  कोरोनाव्हायर फैलावाचं चक्र मोडायलाच हवं.

  घरातली लक्ष्मणरेषा ओलांडून नका

  जान है तो जहाँ है

  20:12 (IST)

  पंतप्रधान मोदी LIVE

  आज रात्री 12 वाजल्यापासून पुढच्या 21 दिवसांपर्यंत देशभर संपूर्ण लॉकडाउन

  हा लॉकडाउन म्हणजे जनता कर्फ्यूपेक्षा कडक उपाययोजना आहे.

  हे 21 दिवस तुम्ही सांभाळलं नाहीत, तर आपण 21 वर्षं मागे जाऊ.

  हे पंतप्रधान म्हणून नाही, तर तुमच्या परिवारातला सदस्य म्हणून सांगतो आहे.

  20:10 (IST)

  आज रात्री 12 वाजल्यापासून देशात संपूर्ण लॉकडाऊन

  20:7 (IST)

  पंतप्रधान मोदी LIVE

  काही लोकांना वाटतंय, की सोशल डिस्टन्सिंग फक्त आजारी व्यक्तींसाठी आहे. पण हा गैरसमज आहे.

  काही लोकांच्या बेपर्वाई, काही लोकांचे गैरसमज यामुळे तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या आई-वडिलांना, तुमच्या मित्रांना खूप मोठ्या संकटात टाकणार आहे.

  अशी बेपर्वा वृत्ती सुरू राहिली, तर भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. ही किंमत केवढी मोठी असेल याचा अंदाजसुद्धा लावणं कठीण आहे.

  20:5 (IST)

  पंतप्रधान मोदी LIVE

  सगळ्या देशांतले तज्ज्ञ हेच सांगत आहेत की या व्हायरसचा फैलाव कमी करण्यासाठी एकमेव प्रभावी मार्ग आहे. सोशल डिस्टन्सिंग.

  याशिवाय कोरोनापासून वाचायचा कुठलाही मार्ग नाही. कोरोनाव्हायरसला रोखायचं असेल तर संक्रमणाच्या सायकलला तोडावंच लागेल.

  मुंबई, 24 मार्च : देशभरात कोरोनाचा संसर्ग मागच्या काही दिवसांत वेगानं पसरताना पाहायला मिळत आहे. देशभरात Coronavirus ने थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्र आणि देशातले यासंबधीचे ताजे अपडेट्स आणि लेटेस्ट न्यूज LIVE