Coronavirus updates : कोरोनाचा देशात दुसरा बळी; राज्यातली संख्याही वाढली; नगरमध्ये 1 पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरस (Cororanvirus) ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात रुग्णांची संख्या 80 च्या वर पोहोचली आहे. कोरोनाव्हायरसबद्दलच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स आणि बातम्या...

 • News18 Lokmat
 • | March 13, 2020, 23:18 IST
  LAST UPDATED 3 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:18 (IST)

  कोरोनाचा देशातला दुसरा बळी! दिल्लीत एका रुग्णाचा मृत्यू

  22:8 (IST)

  कोरोनाची दहशत वाढली; नगरमध्येही सापडला रुग्ण

  राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नागपूरनंतर आता अहमदनगरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. नगर जिल्ह्यात 4 संशयित रुग्ण होते. त्यातल्या एकाची टेस्ट पॉिझिटिव्ह आली आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर गेली आहे.

  21:0 (IST)

  मास्क आणि सॅनिटायझर जीवनावश्यक वस्तू

  सॅनिटायझरचा तुटवडा आणि मास्कचा काळा बाजार रोखण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या दोन्ही गोष्टींची साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.


  17:44 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  LIVE

  पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर इथल्या जीम, थिएटर्स, स्वीमिंग पूल बंद

  मॉल, हॉटेल्स रेस्टॉरंट्स बंद नाहीत. पण तिथे जाणं टाळा.

  सार्वजनिक जत्रा, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमांना सरकार परवानगी देणार नाही. पूर्वी दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.

  जिथे शक्य आहे, त्या सर्व खासगी संस्थांना वर्क फ्रॉम होम करण्यासंदर्भातली मुभा द्यावी

  ही अधिसूचना मध्यरात्रीपासून लागू

  17:42 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  LIVE

  पुढील आदेश येईपर्यंत किमान 30 मार्चपर्यंत जीम्स, चित्रपटगृहं, नाट्यगृह बंद करण्यात येणार.

  कोरोनाबाबतचे निर्णय मध्यरात्रीपासून लागू

  17:41 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  LIVE

  कोरोनाबाबतचे निर्णय मध्यरात्रीपासून लागू

  17:40 (IST)

  साथीच्या रोगासंदर्भात राज्य शासनाने जारी केलं नोटिफिकेशन

  17:40 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE

  चीन, द. कोरिया, इटली, जर्मनी, फ्रान्स, इराण हे सात देश केंद्र सरकारच्या यादीत आहे.

  आपल्याकडचे रुग्ण या 7 देशांव्यतिरिक्त इतर देशांमधून आलेले. त्यानुसार केंद्राला सूचना करण्यात आली आहे. अमेरिका आणि दुबईचा समावेशही यादीत करावा.

  17:38 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  LIVE

  राज्यातली स्थिती आटोक्यात. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं.
  राज्यातल्या 17 कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे.
  सर्व 15 व्यक्ती दुबई, फ्रान्स आणि अमेरिकेतून प्रवास करून आलेल्या होत्या.

  कोरोना व्हायरस (Cororanvirus) ने जगभरात धुमाकूळ घातला आहे.  अनेक राज्यांनी शाळा, मॉल, थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही शासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. भारतात रुग्णांची संख्या 80 च्या वर पोहोचली आहे. कोरोनाव्हायरसबद्दलच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स आणि बातम्या...