• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • गेल्या 24 तासांत 6387 नवीन रुग्णांची नोंद, तरी भारतासाठी आनंदाची बातमी

गेल्या 24 तासांत 6387 नवीन रुग्णांची नोंद, तरी भारतासाठी आनंदाची बातमी

सलग दुसऱ्या दिवशी भारतातील रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळाली. तर गेल्या 24 तासांत 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावरून भारतातील मृत्यू दरही कमी झाल्याचे दिसत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 मे : भारतात दिवसेंदिवस कोरोनाची प्रकरणं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात सध्या 1 लाख 51 हजारहून अधिक रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 6387 नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी भारतातील रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळाली. तर गेल्या 24 तासांत 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावरून भारतातील मृत्यू दरही कमी झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर काही थांबत नाही आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2091 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. तर यात 97 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सर्वात जास्त आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 1002 रुग्णांची नोंद झाली आहे तर 39 रुग्णांचा मृत्यूझाला आहे. मुंबईत आता एकूण कोरोबाधितांची संख्या 32 हजार 974 झाली आहे. तर, 1065 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 5 लाख लोकांना केलं क्वारंटाइन राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोव्हिड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4,30,670 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसंच 5, 65,726 व्यक्तींना क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आलं आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाउनच्या म्हणजे दिनांक 22 मार्च ते 25 मे या कालावधीत कलम 188 नुसार 1,15,263 गुन्हे नोंद झाले असून 23,204 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 5 कोटी 48 लाख 62 हजार 947 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या लाखांच्या घरात गेली असताना देशात असं एक केंद्रशासित प्रदेश आहे जेथे आतापर्यंत एकही रुग्ण सापडला नाही आहे. लक्षद्वीपमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडल्याची नोंद नाही आहे. लक्षद्वीप आपल्या भौगोलिक स्थितीमुळे कोरोनामुक्त राहिला आहे. येथे छोटे छोटे 36 द्वीपांचा एक समूह आहे, ज्याची लोकसंख्या 64 हजार आहे. लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं अंगावर काटा डॉक्टरांचा हा अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांनी अशा कोरोना वॉरियर्सना सलाम केलं आहे.
  Published by:Manoj Khandekar
  First published: