नवी दिल्ली, 23 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) मृतांची संख्या वाढली आहे. हिमाचल प्रदेशात (Himachal pradesh) कोरोनाव्हायरस रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 69 वर्षीय तिबेटियन निर्वासिताचा (Tibetan refugee) मत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
टांडातील रुग्णालयात या तिबेटियन निर्वासितावर उपचार सुरू होते. 15 मार्चला ते अमेरिकेहून भारतात आले होते, अशी माहिती सरकारने दिली आहे.
A 69-year-old Tibetan refugee, who died at a hospital in Tanda in Himachal Pradesh earlier today, has been tested positive for #coronavirus. He returned from the US on March 15: State Additional Chief Secretary (Health) RD Dhiman pic.twitter.com/BwGfUzIlO2
या रुग्णाच्या मृत्यूसह देशातील एकूण मृतांचा आकडा आता 9 वर पोहोचला आहे. तर देशात कोरोनाव्हायरसचे एकूण 467 रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वात जास्त महाराष्ट्रात आहेत.
Death toll due to COVID-19 rises to 8; number of cases climb to 467, including 424 active cases: Union Health Ministry
महाराष्ट्र सरकारने कोरोनाव्हायरसशी मुकाबला करण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. संध्याकाळपासूनच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
देशाच्या राजधानीतही कर्फ्यू
महाराष्ट्र आणि पंजाबपाठोपाठ देशाची राजधानी दिल्लीतही कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.दिल्लीमध्ये कोरोनाव्हायरसचे एकूण 30 रुग्ण आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसचं वाढतं प्रमाण पाहता, दिल्ली सरकारने कर्फ्यू लावला आहे.
जगभरात कोरोनाव्हायरसने 15,000 पेेक्षा जास्त बळी घेतलेत. यातील सर्वाधिक मृत्यू युरोपात झालेत. चीनमध्ये केंद्र असलेल्या कोरोनाव्हायरसने इटली आणि स्पेनमध्ये थैमान घातलं आहे. भारतातही हा विषाणू झपाट्याने पसरतो आहे.