LIVE NOW

Coronavirus LIVE Updates : जनता कर्फ्यूमध्ये ट्रेन सुरू राहणार का? रेल्वेने केला खुलासा

कोरोनाव्हायरसने(Coronavirus) जगभर हाहाकार माजवला आहे. चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला हा जीवघेणा आजार आता जगभर पसरला आहे. भारतही त्याच्या कचाट्यात अडकला आहे. महाराष्ट्रात सर्वाधित Covid-19 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत आणि हा आकडा वाढतो आहे. देश आणि राज्यातल्या या लढ्याविरोधातल्या घडामोडींचे अपडेट्स आणि ताज्या बातम्या इथे पाहा.

Lokmat.news18.com | March 20, 2020, 10:42 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated March 20, 2020
auto-refresh

Highlights

10:42 pm (IST)
Coronavirus चा होणार फायदा! 75 हजार जणांचा जीव वाचेल असा संशोधकाचा दावा coronavirus-lockdown-decrease-pollution-saves-life-of-50-70-thousand-people-research mhsy | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News
10:42 pm (IST)
मध्यप्रदेशातही पोहोचला कोरोना, जबलपूरमध्ये 4 जण पॉझिटिव्ह, Coronavirus reached in Madhya Pradesh Jabalpur 4 positive | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News
10:22 pm (IST)

22 मार्चला ट्रेन सुरू राहणार का?

 मेल आणि एक्स्प्रेस गाड्या मात्र पहाटे 4 ते रात्री 10 या वेळात बंद राहतील. मुंबईच्या उपनगरीय गाड्या म्हणजे लोकल मात्र सुरू राहतील. पण त्यांच्या फेऱ्या कमी करण्यात येतील. रेल्वेने हे परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.

 


10:18 pm (IST)

जनता कर्फ्यूच्या दिवशीही लोकल राहणार सुरू; पण मेल एक्स्प्रेस बंद

कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 22 मार्च रोजी स्वयंस्फूर्तीनं संचारबंदी पाळण्याचं आवाहन केलं आहे. या जनता कर्फ्यूदरम्यान मुंबईत लोकलसेवा सुरू राहणार आहे. पण कमी प्रमाणात लोकल सोडण्यात येतील, असं रेल्वेने कळवलं आहे. मेल आणि एक्स्प्रेस गाड्या मात्र पहाटे 4 ते रात्री 10 या वेळात बंद राहतील. या दिवशी या वेळेत सुटणाऱ्या सगळ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. देशभरातील सुमारे 1300 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त या वेळेच्या आधी सुटलेल्या आणि धावत्या ट्रेन सुरू राहतील.

9:09 pm (IST)

अखेर कनिका कपूरविरोधात पोलीसांनी दाखल केला गुन्हा

कनिका कपूरविरोधाक लखनौ पोलिसांनी FIR दाखल केली आहे. आयपीएस कलम 269 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

8:54 pm (IST)
संसदेत पोहोचला Coronavirus? खासदारांनी सुरू केलं सेल्फ क्वारंटाइन derek-o-brien self quarantine coronavirus threat in india reached parliament mp dushyant kanika kapoor | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News
6:59 pm (IST)
येणारा काळ कठीण, गर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल- अजित पवार | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News
5:56 pm (IST)

अजित पवार यांनी दिला लॉक डाउनचा इशारा

अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोनाव्हायरसचा धोका मोठा असल्याचं सांगितलं. पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त तातडीच्या सेवा पुरवणार्यांसाठी सुरू ठेवल्या आहेत. आता जर ऐकणार नसतील तर फक्त या कर्मचार्यांना ने आण करण्यासाठी बस ठेवून बाकी सगळं बंद करावं लागेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

5:48 pm (IST)

देशातला आकडा 223 वर. परदेशातून महाराष्ट्रात आलेले 281 जण निरीक्षणाखाली

वेगवेगळ्या देशांतून महाराष्ट्रात आलेले 281 जणांवर प्रशासनाचं लक्ष आहे. त्यांची चाचणी इतक्यात केलेली नसून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, असं सरकारतर्फे सांगण्यात आलं. दरम्यान देशात Covid-19 पॉझिटिव्ह लोकांचा आकडा वाढला आहे. ही संख्या 223 वर पोहोचली आहे. यामध्ये 32 परदेशी व्यक्ती आहेत. आतापर्यंत देशभरात या विषाणूने 4 जणांचा जीव गेला आहे.

 

4:58 pm (IST)

चंदिगडमध्ये कोरोनाचे 5 पॉझिटिव्ह

Load More
कोरोनाव्हायरसने(Coronavirus) जगभर हाहाकार माजवला आहे. चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला हा जीवघेणा आजार आता जगभर पसरला आहे. भारतही त्याच्या कचाट्यात अडकला आहे. महाराष्ट्रात सर्वाधित Covid-19 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत आणि हा आकडा वाढतो आहे. देश आणि राज्यातल्या या लढ्याविरोधातल्या घडामोडींचे अपडेट्स आणि ताज्या बातम्या इथे पाहा.