BREAKING : भारताचा मोठा निर्णय; ब्रिटनमधून येणाऱ्या सगळ्या फ्लाइट्स केल्या रद्द
ब्रिटनमध्ये (UK new strain of coronavirus) कोरोनाव्हायरसचा धोकादायक प्रकार सापडला आहे. त्या केसेसची नोंदणी झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली, 21 डिसेंबर : भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ब्रिटनमध्ये (new strain of coronavirus UK ) कोरोनाव्हायरसचा नवा प्रकार समोर आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. : देशात कोरोनाची दुसरी लाट येणार की काय (coronavirus live updates) अशी भीती तज्ज्ञांमध्ये व्यक्त केली जात असताना विदेशातून मात्र अजून एक गंभीर बातमी समोर आली आहे. ब्रिटन (UK) अर्थात युनायटेड किंग्डममध्ये कोरोनाच्या (corona) अधिक घातक रुपातलं उत्परिवर्तन (mutation) आढळलं आहे. त्यामुळे विमान वाहतूक बंद करण्याची मागणी होत होती.
21 डिसेंबरच्या मध्यरात्रीसून 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच्या भारत- ब्रिटन दरम्यानच्या सगळ्या विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधीची घोषणा मंत्रालयाने केली आहे.
Considering the prevailing situation in UK. Govt. of India has decided that all flights originating from UK to India to be suspended till 31st December 2020 (23.59 hours).
डिसेंबर अखेरीपर्यंत भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांवर क्वारंटाइनचे कडक नियम करण्यात आले आहेत.
आतापर्यंत ब्रिटनमधून इथे आलेल्या किंवा ब्रिटनमधल्या कुठल्याही शहरात थांबा घेऊन आलेल्या (Transit passangers) प्रवाशांना कोरोना चाचणी (RT-PCR test) बंधनकारक करण्यात आली आहे. विमानतळावरच त्यांची चाचणी करावी आणि या चाचणीचा निकाल आल्याशिवाय त्यांना घरी जाता येणार नाहीस, असाही नियम करण्यात आला आहे.
ब्रिटनच्या युरोपीय शेजाऱ्यांनी रविवारपासून युकेसाठी आपले दरवाजे बंद करणं सुरू केलं आहे. मिडल ईस्टच्या काही राष्ट्रांनीही हेच पाऊल उचललं आहे.