Home /News /national /

भारतातल्या 'या' राज्यात सर्वात महाभयंकर कोरोनाव्हायरसचा कहर

भारतातल्या 'या' राज्यात सर्वात महाभयंकर कोरोनाव्हायरसचा कहर

गुजरात (Gujrat) आणि मध्य प्रदेशमध्ये (Madhya pradesh) कोरोनाव्हायरसचा L हा घातक स्ट्रेन कहर माजवत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. 

    नवी दिल्ली, 27 एप्रिल :  इतर देशांपेक्षा भारतातील (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) घातक नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. मात्र काही राज्यांमधील कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा घातक स्ट्रेन (strain) सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशात गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरने (Gujarat Biotechnology Research Centre - GBRC) नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, चीनच्या वुहानमध्ये जो घातक असा L टाइप  (L strain) कोरोनाव्हायरस दिसून आला तोच गुजरातमध्येही आहे आणि गुजरामधील मृत्यूदर जास्त असण्यामागे हेच कारण असू शकतं.  तर दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाव्हायरसचा S स्ट्रेन (S strain) दिसून आहे, जो L पेक्षा कमजोर आहे आणि त्यामुळेच केरळमधील मृत्यूदर कमी असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. हे वाचा - दाट लोकसंख्या, प्रचंड गरीबी तरी विकसित देशापेक्षा दक्षिण आशियात कोरोनाचा कहर कमी GBRC चे संचालक सीजी जोशी यांनी 'द हिंदू'शी बोलताना सांगितलं की, "L स्ट्रेन व्हायरसचा  S टाइप स्ट्रेन पेक्षा जास्त घातक असतो. जगभरात ज्या ठिकाणी कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, तिथं हाच स्ट्रेन सापडला आहे" केरळमध्ये दुबईहून आलेल्या व्हायरसचा प्रसार झाला आहे, जिथं S स्ट्रेनची जास्त प्रकरणं आहेत. तर इटली आणि फ्रान्समध्ये L स्ट्रेनवाले रुग्ण जास्त होते, या ठिकाणाहून भारतात परतलेल्या भारतीयांसह L स्ट्रेन टाइप आला. आणखी एक स्ट्रेन न्यूयॉर्कमध्ये दिसून आला, ज्यावर शास्त्रज्ञांचा अभ्यास अद्याप सुरू आहे. घातक आहे कोरोनाव्हायरसचा L स्ट्रेन पेकिंग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस (Peking University’s School of Life Sciences) आणि शांघाई युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी 103 रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास केला, ज्यामध्ये त्यांना कोरोनाव्हायरसचे 2 प्रकार दिसून आले, त्याला त्यांनी  L आणि S अशी नावं दिली. याच्या लक्षणांमध्येही बराच फरक आहे. डिसेंबरमध्ये वुहानमध्ये कोरोनाव्हायरसचा L टाइप दिसला तो खूप घातक आहे. मात्र जानेवारीनंतर आलेल्या प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरस S टाइपमध्ये बदलण्यात आला. S स्ट्रेन इतका गंभीर नाही, मात्र या प्रकारात आजाराची लक्षणं उशिरानं दिसतात किंवा दिसतच नाही. त्यामुळे रुग्णांची चाचणी उशिरा होते, व्हायरस शरीरात भरपूर कालावधीपासून असतो आणि अप्रत्यक्षरित्या अनेकांपर्यंत पसरत असतो. हे वाचा - Work from home मुळे थकवा, या टिप्स फॉलो करा आणि व्हा रिलॅक्स नॅशनल सायन्स रिव्ह्यू मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार कोरोनाव्हायरसचा S स्ट्रेन टाइप खूप जुना आहे, मात्र फक्त 30% प्रकरणांमध्ये तो दिसून येतो. तर घातक असा L टाइप हा व्हायरसच्या म्युटेशनपासून तयार झाल्याचं मानलं जातं आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये L स्ट्रेन तज्ज्ञांच्या मते, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाव्हायरसचा L स्ट्रेन जास्त प्रभावी आहे आणि यामुळेच गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मृत्यूदर जास्त आहे. महात्मा गांधी मेमोरिअल मेडिकल कॉलेजचे डीन ज्योती बिंदल यांच्या मते, इंदोरमध्येही हाच व्हायरस जास्त दिसून येतो आहे आणि हेच तपासण्यासाठी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे 57 नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात येत आहेत. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या