कोरोनाचा परिणाम! तरुणानं दारूची मागितली होम डिलिव्हरी, कोर्टानं दिली 'ही' शिक्षा

कोरोनाचा परिणाम! तरुणानं दारूची मागितली होम डिलिव्हरी, कोर्टानं दिली 'ही' शिक्षा

एक तरुणानं दारूची होम डिलिव्हरी करण्यात यावी यासाठी चक्क न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.

  • Share this:

तिरुअनंतरपूरम, 21 मार्च : एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार पसरला असताना भारताती आता कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्याते वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 258 लोकांना कोरोनाची लागण झाली असून महाराष्ट्रातील 63 लोकांचा त्यात समावेश आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. तर देशातील अनेक शहरांमध्ये आज आणि उद्या लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यातच दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक तरुणानं दारूची होम डिलिव्हरी करण्यात यावी यासाठी चक्क न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. याचिकाकर्त्यानं थेट दारू घरपोच देण्याची याचिका न्यायालयात दाखल केल्यानं त्याला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ऑनलाई शॉपिंग अॅपवरून दारू थेट घरपोहोच यावी यासाठी तरुणानं केरळच्या उच्च न्यायालयात शुक्रवारी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं 50 हजार रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. यासाठी याचिकाकर्त्याला एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

हे वाचा-Janta Curfew : पंतप्रधानांच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण देशाने केला होता उपवास

याचिकाकर्त्यानं आठवड्याच्या आत दंड भरला नाही तर कारवाई करण्यात येईल असा आदेश देण्यात आला आहे. दारूच्या दुकानात सध्या वाढणाऱ्या गर्दीमुळे तासंतास उभं राहावं लागतं. त्यामुळे ऑनलाईन स्वरुपात दारूची विक्री घरपोच करण्यात यावी अशी याचिका तरुणानं कोर्टात केली होती. ही याचिका कोर्टानं फेटाळली असून तरुणाला त्याबदल्यात दंड ठोठावला आहे. कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशातील वाढत्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली असताना अशा प्रकारची याचिका करणं म्हणजे एकप्रकारे या सगळ्याची खिल्ली उडवल्यासारखं असल्याचं केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी देशातील सध्याच्या स्थितीचं भान बाळगणं आवश्यक असल्याचंही म्हटलं आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्यात आता 63 वर पोहोचली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात आज 21 मार्च रोजी एकूण रुग्णांची संख्या ही 63 वर पोहोचली आहे. गुरुवारी ही संख्या 52 वर होती. त्यामुळे गेल्या 24 तासांत 11 नवीन रुग्ण आढळून आल्याची बाबसमोर आली आहे.

हे वाचा-परदेशात प्रवास न करताही पुण्यातील महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2020 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading