धक्कादायक! इंडिगो एअरलाइन्समधील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

धक्कादायक! इंडिगो एअरलाइन्समधील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांची जबाबदारी इंडिगो कंपनी घेणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

चेन्नई, 12 एप्रिल : देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टरांनंतर आता हवाई क्षेत्रातही कोरोना व्हायरसनं घुसखोरी केली आहे. इंडिगो एअरलाईन्समधील (Indigo Airlines) एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याचं वय साधारण 55 ते 60 असावं. हा कर्मचारी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर होता. मृत्यूनंतर आलेल्या रिपोर्टमध्ये हा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. एअरलाईन्समध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला हा पहिला रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. एअरलाईन्समध्ये कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांची जबाबदारी इंडिगो कंपनी घेणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. हवाई क्षेत्रात विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी ही पहिली केस असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आणखीन कोण आलं होतं का? याची तपासणी केली जात आहे.

हे वाचा-कोरोना रोखण्यासाठी बारामतीकरांनी लढवली नवी शक्कल, वाचा काय आहे 'बारामती पॅटर्न'

देशात कोरोना रुग्णांना आकडा वाढतो आहे. आज ही संख्या 7 हजार 400च्या वर गेली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला. देशात 586 कोव्हिड हॉस्पिटल्स तयार झाले असून 1 लाख आयसोलेशन बेड्सही तयार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

ओडिसा आणि त्यापाठोपाठ पंजाबनेही 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर संपूर्ण देशभरात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. तर रविवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.

हे वाचा-सोशल मीडियावर फिरणाऱ्या धारावीतल्या 'त्या' VIDEO मागील हे आहे सत्य

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 12, 2020, 7:13 AM IST

ताज्या बातम्या