Home /News /national /

कोरोनाग्रस्ताच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके, ग्रामस्थांच्या आरोपानंतर प्रशासनाने केले अंत्यसंस्कार

कोरोनाग्रस्ताच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके, ग्रामस्थांच्या आरोपानंतर प्रशासनाने केले अंत्यसंस्कार

एका अर्धवट जळालेला मृतदेहाचे लचके कुत्री आणि कावळे तोडत होते. ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाला धारेवर धरताच त्यावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले.

    पटना, 22 मे : कोरोना व्हायरसमुळे अनेक धक्कादायक गोष्टी घडत आहेत. कोरोना रुग्णांना वाईट वागणूक दिल्याचं तसंच मृतांच्या अंत्यसंस्काराला विरोध केल्याचे प्रकारही घडले आहेत. बिहारमधील कोनहारा इथं एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. या मृतदेहाचे लचके कुत्री आणि कावळे तोडत होते ही बामती प्रशासनाला मिळताच खळबळ उडाली. स्थानिकांनी प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह गुरुवारी अंत्यसंस्कारासाठी आणला होता. मात्र त्याला अर्धवट जळालेल्या स्थितीतच सोडलं होतं. शेवटी या मृतदेहावर कावळ्यांसह कुत्र्यांनी झडप मारली. लोकांना याची माहिती होताच त्यांनी प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला. प्रशासनाने गावकऱ्यांचे आरोप फेटाळून लावत तो मृतदेह कोरोना रुग्णाचा नसल्याचं म्हटलं आहे. तर सिव्हिल सर्जन इंद्रदेव यांनी सांगितलं की, कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ग्रामस्थांनी जे मृतदेहाचे अवषेश दाखवले ते इतर कोणाचे असू शकतात. हे वाचा : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने माजी मंत्र्याच्या PSO ची फाशी लावून आत्महत्या ग्रामस्थांच्या विरोधानंतर अखेर अर्धवट जळालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कऱण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाने सारवासारव केल्याचंही स्थानिकांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी नोएडातून आलेल्या राजेश कुमारने आत्महत्या केली होती. तो क्वारंटाइन होता आणि त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्याच्यावर कोनहारा घाटावर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे ग्रामस्थानी प्रशासनाला धारेवर धरलं होतं. हे वाचा : उपचारानंतर कोरोनावर मात करून घरी गेलेल्या युवतीला पुन्हा झाला संसर्ग
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या