उपचारानंतर कोरोनावर मात करून घरी गेलेल्या युवतीला पुन्हा झाला संसर्ग

उपचारानंतर कोरोनावर मात करून घरी गेलेल्या युवतीला पुन्हा झाला संसर्ग

कोरोनातून बऱ्या झालेल्या तरुणीला पुन्हा लागण झाल्याचं उघड झालं आहे. घरी गेल्यानंतर तिची COVID टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

  • Share this:

इंदौर, 22 मे : एकदा कोरोनावर (Coronavirus)मात केल्यानंतर पुन्हा त्याचा संसर्ग होऊ शकतो का, याचं ठाम उत्तर अद्याप वैद्यकीय तज्ज्ञ देऊ शकत नसले, तरी असं एक उदाहरण समोर आल्यामुळे धोका वाढला आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यानंतर गुजरातमधली काही शहरं सोडली तर मध्य प्रदेशातल्या इंदौरमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त सापडत आहेत. याच इंदौरमध्ये एका कोरोनातून बऱ्या झालेल्या तरुणीला पुन्हा लागण झाल्याचं उघड झालं आहे.

ही युवती कोरोना पॉझिटिव्ह होती. सात दिवसांत तिची COVID-19 टेस्ट निगेटिव्ह आली. कुठलंही लक्षणही उरलं नव्हतं. ती ठणठणीत बरी होऊन घरी गेली. आता या तरुणीला काही दिवसांतच पुन्हा खोकल्यासारखी लक्षणं दिसू लागली आहेत. तिची कोरोना टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

या युवतीच्या घरातल्या काही मंडळींना संसर्ग झाला होता. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे तिला पुन्हा संसर्ग झाला असावा, असं डॉक्टर सांगत आहेत. या तरुणीला पुन्हा एकदा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

कोरोनाला हरवलं, आता बर्फाचा डोंगर सर करायला गिर्यारोहक तयार

मध्य प्रदेशात इंदौरमधल्या चोइथराम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. पुन्हा एकदा तिला अॅडमिट केलं आहे. सात दिवसांनंतर कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर तिला घरी सोडलं तेव्हा तिने स्वतःला वेगळं ठेवणं अपेक्षित होतं. होम क्वारंटाइन व्हायला तिला सांगितलं होतं. पण तिने या नियमांचं काटेकोर पालन केलं नसावं.

तिच्या छोट्या भावाला सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणं दिसल्यावर त्याची तपासणी करण्यात आली. तिच्या संपूर्ण कुटुंबाची COVID-19 ची चाचणी केल्यावर या मुलीला पुन्हा एकदा कोरोनाने गाठलं असल्याचं लक्षात आलं.

अन्य बातम्या

काँग्रेस प्रवक्ता संजय झा कोरोना पॉझिटिव्ह; काळजी घेण्याचं केलं आवाहन

एका लग्नामुळे गाव आलं अडचणीत, क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर पडलं जोडपं आणि...

विराट कोहलीचा Dinosaur Walk पाहिला का? सोशल मीडियावर Memes चा पाऊस

First published: May 22, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading