कोरोनाचं थैमान : चीनमधून 324 भारतीयांची सुटका, एअरलिफ्ट करून आणलं दिल्लीत

कोरोनाचं थैमान : चीनमधून 324 भारतीयांची सुटका, एअरलिफ्ट करून आणलं दिल्लीत

या लोकांच्या सुटकेसाठी एअर इंडियाचं खास डबल डेकर जंबो 747 हे विमान पाठविण्यात आलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : चीनच्या वुहानमध्ये कोरोनामुळे अडलेल्या भारतीयांची सुटका करण्यात आलीय. 324 जणांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान सकाळी 7.30 वाजता दिल्लीत पोहोचलं. यात सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विमानतळावर या सगळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना निगराणीखाली ठेवण्यात येईल. तर ज्यांना उपचाराची गरज आहे त्यांच्यावर उपचार केले जातील. दिल्लीत या रुग्णांसाठी खास व्यवस्था करण्यात आली असून स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आलाय. त्यात या सगळ्यांना ठेवण्यात येणार आहे.

या लोकांच्या सुटकेसाठी एअर इंडियाचं खास डबल डेकर जंबो 747 हे विमान पाठविण्यात आलं होतं. विमानात तज्ज्ञ डॉक्टरांची एक पथकही सज्ज होतं. त्याचबरोबर विमानतळावरही डॉक्टरांना सज्ज ठेवण्यात आलं आहे.

वुहानपासून सुरू झालेला हा संसर्ग संपूर्ण चीनमध्ये पसरला आहे आणि अमेरिकेसह जवळपास डझनभर देशात संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. अमेरिका, फ्रान्स आणि रशिया यांनी नागरिकांना वुहानमधून बाहेर काढण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर, इतर देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी संभाव्य संसर्ग वेगळ्या ठिकाणी ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत चीनमध्ये 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 हजारहून अधिकांना याची लागण झाली आहे. त्याचबरोबर भारतातही केरळमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे.

केरळमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची ओळख पटली असल्यामुळं केंद्र सरकारनं तयारीला सुरुवात केली आहे. दिल्लीमध्येही या विषाणूची लागण झालेल्या संशयित रुग्ण आढळले आहेत. कोराना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक शहरे बंद करण्यात आली आहेत. तर काही शहरांमधील लोक संक्रमण टाळण्यासाठी स्वत:च्या घरात कैद झाले आहेत.

चीनचे अध्यक्ष जिनपिंग म्हणाले की, "चीन गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे पण त्याचवेळी कोरोना विषाणूविरूद्ध चीन ही लढाई जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला." सार्स सारख्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांना गती देऊन चीनने येत्या 15 दिवसांत वुहानमध्ये 1300 खाटांचे आणखी एक तात्पुरते रुग्णालय बांधण्याची घोषणा रविवारी केली.

First published: February 1, 2020, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading