Home /News /national /

'या बेपर्वाईची किंमत किती मोजावी लागेल याचा अंदाज लावणंसुद्धा कठीण' - मोदींनी सांगितलं धक्कादायक तथ्य

'या बेपर्वाईची किंमत किती मोजावी लागेल याचा अंदाज लावणंसुद्धा कठीण' - मोदींनी सांगितलं धक्कादायक तथ्य

काही लोकांना वाटतंय, की सोशल डिस्टन्सिंग फक्त आजारी व्यक्तींसाठी आहे. पण हा गैरसमज आहे. अशाच गैरसमजांमुळे आणि बेपर्वा वृत्तीमुळे तुम्ही तुमच्याच घरच्यांना मोठ्या संकटात टाकत आहात, असं पंतप्रधान म्हणाले.

    नवी दिल्ली, 24 मार्च : "काही लोकांमध्ये असणारे गैरसमज आणि आणखी काही लोकांची बेपर्वाई यामुळे तुम्ही आम्ही सगळे मोठ्या संकटात जात आहोत. ही बेपर्वाई तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या आई-वडिलांना, तुमच्या मित्रांना खूप मोठ्या संकटात टाकणार आहे", अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना पुढच्या धोक्याचा इशारा दिला. रात्री आठ वाजता देशाला उद्देशून संदेश देताना त्यांनी Coronavirus ची ही साथ किती भीषण आहे, हे समजावून सांगितलं. शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळले नाहीत, तर हजारो जीव जातील, असंही त्यांनी सांगितलं. 21 दिवसांचा लॉकडाउन देशभरात पुढचे 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊ असणार आहे. या लॉकडाऊनचे निर्बंध जनता कर्फ्यूपेक्षा कडक असतील, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. 'लोक कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. या विषाणूचा संसर्ग अशामुळे वाढतो आहे. निर्बंधाचं पालन होत नाही.  अशी बेपर्वा वृत्ती सुरू राहिली, तर भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. ही किंमत केवढी मोठी असेल याचा अंदाजसुद्धा लावणं कठीण आहे', अशा शब्दांत मोदींनी पुढच्या संकटाची जाणीव करून दिली. काही लोकांना वाटतंय, की सोशल डिस्टन्सिंग फक्त आजारी व्यक्तींसाठी आहे. पण हा गैरसमज आहे. अशाच गैरसमजांमुळे आणि बेपर्वा वृत्तीमुळे तुम्ही तुमच्याच घरच्यांना मोठ्या संकटात टाकत आहात, असं पंतप्रधान म्हणाले. वाचा - निष्काळजीपणामुळे परिस्थिती बिघडली, अमेरिकेत एका दिवसात 10,000 कोरोनाबाधित पंतप्रधान म्हणाले, 22 मार्चला देशवासियांनी  जनता कर्फ्यूमध्ये आपलं योगदान दिलं. संकटाच्या या काळात सर्व एकत्र आले आणि जगाला दाखवून दिलं. मानवता आणि देशावर संकट आलं तर आम्ही सर्व भारतीय एकत्र येवून त्याचा सामना करतो हे जगाला दाखवून दिलं आहे. जगातल्या शक्तिशाली देशांनाही कोरोनाने गुडघे टेकायला लावलं आहे. या देशांजवळ सर्व साधनं असतानांही कोरोना वेगाने पसरत आहे. कोरोनाशी लढायचं असेल तर सोशल डिस्टसिंगशिवाय कुठलाही पर्याय नाही असं जगातले तज्ज्ञ सांगत आहेत. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. घरात थांबणं हे फक्त रुग्णच नाही तर प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते. अन्य बातम्या 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर, वाचा काय आहे 'कर्फ्यू आणि लॉकडाऊन'मधील फरक? 'चला मावळ्यांनो...', संभाजीराजेंनी दिला कोरोनाला हरवण्याचा मंत्र

    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या