Home /News /national /

कोरोना चाचणीत देशाला मोठं यश, आतापर्यंत 40 कोटी लोकांच्या कोरोना TEST पूर्ण

कोरोना चाचणीत देशाला मोठं यश, आतापर्यंत 40 कोटी लोकांच्या कोरोना TEST पूर्ण

Corona Test: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. अशातच देशानं एक मोठं यश संपादन केलं आहे.

    नवी दिल्ली, 26 जून: देशात कोरोना (Corona Virus) व्हायरसची दुसरी लाट (Second Wave)आटोक्यात येत आहेत. गेल्या वर्षीपासून थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा सामना केंद्र सरकारसह देशातल्या सर्व राज्य करत आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. अशातच देशानं एक मोठं यश संपादन केलं आहे. भारत देशानं कोरोनाच्या चाचणीत (Corona Testing) एक नवी नोंद केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) महत्त्वाची माहिती दिली आहे. ICMRनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 40 कोटी लोकांची कोरोना चाचणी (Corona Testing) झाली आहे. 25 जून म्हणजेच शुक्रवारी हा आकडा पूर्ण झाला आहे. हा आकडा गाठण्यासाठी जूनमध्ये दररोज 18 लाख लोकांच्या कोरोनाची चाचणी घेतली गेली. ज्यामुळे 25 जून रोजी 40 कोटी 18 लाख 11 हजार 892 लोकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली. गेल्या वर्षी 7 जुलै रोजी देशातील 1 कोटी लोकांच्या कोरोना चाचणीचे लक्ष्य पूर्ण करण्यात आलं होतं. यानंतर 23 ऑक्टोबरला 2020 ला 10 कोटी लोकांची तपासणी करण्याचे आणि यावर्षी 6 फेब्रुवारी 2021 रोजी 20 कोटी लोकांच्या चाचण्या घेण्याचा आकडा पूर्ण झाला, असं ICMRनं म्हटलं आहे. हेही वाचा- PMC बँकेच्या निर्बंधात सहा महिन्यांची वाढ, RBIनं दिलं 'हे' कारण यंदा 6 एप्रिल रोजी देशातील 25 कोटी, 8 मे रोजी 30 कोटी आणि 1 जूनला 35 कोटी लोकांच्या कोरोना तपासणीचे लक्ष्य पूर्ण झाला. आता 25 जून रोजी सरकारने 40 कोटींहून अधिक लोकांच्या कोरोना चाचणीचा आकडा पार केला असल्याचं ICMRने सांगितलं आहे. पुढे आयसीएमआरने म्हटले आहे की, कोरोनाच्या जास्त चाचणी केल्यानं कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू केले जात आहेत. यामुळे लोकांचे जीवही वाचतात. यासह कोरोनाच्या चाचणीमुळे कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यास मदत देखील होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या