Home /News /national /

देशात 24 तासांत 4 मृत्यू; देशातली कोरोनाग्रस्तांची संख्या 649 वर

देशात 24 तासांत 4 मृत्यू; देशातली कोरोनाग्रस्तांची संख्या 649 वर

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 649 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 4 जणांचे मृत्यू Covid-19 मुळे झाले आहेत.

  नवी दिल्ली, 26 मार्च : देशात Coronavirus च्या साथीविषयी ताजी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जारी करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 649 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 4 जणांचे मृत्यू Covid-19 मुळे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. नागपूर आणि मुंबईत नवे रुग्ण सापडल्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 125 झाली आहे.

  महाराष्ट्रात Coronavirus चा धोका वाढतोच आहे. आता नागपुरात आणखी एक 42 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 125 झाला आहे. देशात कोरोनाव्हायरस पसरण्याचा दर आता एका जागी स्थिरावल्यासारखा वाटतो आहे, पण अर्थात ही सुरुवातीची आकडेवारी आहे, असं लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात मात्र कोरोनारुग्णांमध्ये वाढच होत आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, पुण्यात गेल्या 48 तासांत एकाही नव्या रुग्णाची भर पडलेली नाही. नवी मुंबईत मात्र एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या 4 झाली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. दुसरीकडे आज पुन्हा तीन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. नागपूरमध्ये सापडलेला 42 वर्षांचा नवा रुग्ण परदेशातून आलेला नाही. किंवा त्याचा कुठल्या परदेशातून आलेल्या व्यक्तीशी थेट संपर्क झाल्याचं लक्षात नाही. तो दिल्लीहून नागपूरमध्ये आलेला होता. त्यामुळे आता कम्युनिटी ट्रान्समिशनची भीती वाढली आहे. तत्पूर्वी ठाण्यात आणखी एक तर पनवेलमध्ये एक असे दोन नवे कोरोना रुग्ण आज सकाळपासून समोर आले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे देशाबाहेर चीननंतर आता इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये झापाट्याने कोरोनाचा प्रसार होत आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा 21 हजारांवर गेला आहे. तर 4 लाख 72 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून हा आकडा लवकरच 5 लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज   Johns Hopkins Universityच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मृत्यूची संख्या जास्त असलेले पहिले 5 देश  Italy - 7,503 Spain 3,647 Hubei China - 3,169  Iran - 2,077  France - 1,331 deaths

  अन्य बातम्या कोरोनामुळे झाला मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी आणि नंतर 'अशी' घेतली खबरदारी चंद्रपूरच्या मशिदीत सापडले 11 तुर्कस्तानी मौलवी, गेल्या 22 दिवसांपासून होते लपून
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Corona virus in india, Coronavirus

  पुढील बातम्या