Home /News /national /

Paytm मध्ये 'कोरोना'; गुरुग्रामच्या ऑफिसमध्ये एकाला संसर्ग; भारतात रुग्णांची संख्या 29

Paytm मध्ये 'कोरोना'; गुरुग्रामच्या ऑफिसमध्ये एकाला संसर्ग; भारतात रुग्णांची संख्या 29

कोरोनाची लागण झालेल्या या विद्यार्थ्यानं सोमवारी शाळेमध्ये बर्थडे पार्टी दिली होती. यामध्ये शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कोरोना पीडित तरुणाच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली की नाही हे रिपोर्टनंतरच कळू शकणार आहे.

कोरोनाची लागण झालेल्या या विद्यार्थ्यानं सोमवारी शाळेमध्ये बर्थडे पार्टी दिली होती. यामध्ये शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कोरोना पीडित तरुणाच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली की नाही हे रिपोर्टनंतरच कळू शकणार आहे.

इटलीमधून परतलेल्या Paytm एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता दिल्ली, नोएडा पाठोपाठ गुरुग्राममध्येही हा व्हायरस पोहोचला आहे.

    गुरुग्राम, 4 मार्च : दिल्लीनंतर आता गुरुग्राममध्येही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ऑनलाइन पेमेंटची मोठी भारतीय कंपनी असणाऱ्या PayTm मध्ये Coronavirus चा शिरकाव झाला आहे. गुरुग्रामच्या पेटीएमच्या ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कंपनीने गुरुग्रामचं ऑफिस किमान दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये (China) पसरलेल्या साथीच्या रोगाने संपूर्ण जगामध्ये रौद्र रूप धारण केलं आहे. भारतालाही याचा धोका जाणवत असून सध्या देशात (India) कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या 29  वर गेली आहे. PayTm कंपनीचा एक कर्मचारी नुकताच इटलीला गेला होता. तपासणीनंतर COVID-19 चा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता कंपनीने गुरुग्राम आणि नोएडा ऑफिस किमान दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची टेस्ट केली जाणार आहे. इतर सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे. संसर्ग रोखण्यासाठी ऑफिसमध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात येणार आहे. या कंपनीची नोएडात पाच आणि गुरुग्राममध्ये एक कार्यालय आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसने 3110 बळी घेतले आहेत. सर्वाधिक संख्या चीनमधल्या मृत्यूंची आहे. इराण आणि दक्षिण कोरियातही या व्हायरसने बळी घेतले आहेत. दिल्लीमधील एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आग्र्यातील (Agra) 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर जयपूर (Jaipur) येथे पर्यटनासाठी आलेल्या इटालियन (Italian) ग्रुपमधील 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय ड्रायव्हरलाही या आजाराची लागण झाली आहे. हैद्राबादमध्ये (Hyderabad) एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या केरळात (Kerala) 3 बाधित रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कोरोनाला रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात असून यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली आहे. अन्य बातम्या हुश्श! भारतातील उन्हाळ्यात नाही टिकणार कोरोना! प्रमुख भारतीय वैज्ञानिकाचा दावा 'हँडशेक, किस, मिठी' अजिबात नको; 'कोरोना'च्या भीतीनं 'या' देशांनी बदलल्या सवयी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona virus, Coronavirus

    पुढील बातम्या