Home /News /national /

भारताने 'कोरोना'विरोधातील लढा जिंकला ! केरळातील दुसऱ्या रुग्णाला डिस्चार्ज

भारताने 'कोरोना'विरोधातील लढा जिंकला ! केरळातील दुसऱ्या रुग्णाला डिस्चार्ज

पुण्यातील (Pune) नॅशनल इन्स्टिट्टुयट ऑफ व्हायरोलॉजीमधून (National Instiute of Virology) केरळमधील कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णाच्या रक्ताचे नमुने आता नेगेटिव्ह (negative) आलेत.

    तिरुवनंतरपुरम, 13 फेब्रुवारी : संपूर्ण जग कोरोनाव्हायरशी (Coronavirus) लढा देतो आहे आणि भारताने (India) हा लढा जिंकलेला आहे. केरळातील दुसऱ्या रुग्णाला आज (गुरुवारी) डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. अलाप्पुझा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (Alappuzha Medical college hospital) त्याच्यावर उपचार सुरू होते. चीनच्या (China) वुहानमध्ये (Wuhan) केरळाचा हा विद्यार्थी शिकत होतो. 24 जानेवारीला तो वुहानहून केरळात परतला. 2 फेब्रुवारीला त्याच्या रक्ताचे नमुने कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह होते. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्टुयट ऑफ व्हायरोलॉजीमधून (National Instiute of Virology) कोरोनाव्हायरसच्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने आता नेगेटिव्ह (negative) आलेत. दोनदा नेगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर या रुग्णाला घरी सोडण्यात आलं आहे, असं वृत्त एएनआय (ANI) दिलं आहे. भारतातील पहिला कोरोनाव्हायरसचा रुग्ण थ्रिसुरमध्ये तर तिसरा कासारगोडमध्ये सापडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्याही रक्ताचे नमुने पुण्यातील NIV ला पाठवण्यात आलेत. हे नमुने नेगेटिव्ह येण्याची प्रतीक्षा आहे, त्यानंतर त्यांना डिस्जार्च दिला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. भारतात आणखी 4 नवे रुग्ण देशात सुरुवातीच्या 3 कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे, हे भारतासाठी आनंदाची बातमी आहे, मात्र दुसरीकडे आणखी 4 नवे रुग्ण आढळून आलेत. याबाबत सविस्तर माहितीसाठी खालील बातमी वाचा हेदेखील वाचा - भारतात कोरोनाचा धोका वाढला ! आणखी 4 रुग्णांना व्हायरस, तर एक संशयितही सापडला जपानच्या क्रुझवरील भारतीयांची प्रकृती स्थिर जपानच्या डायमंड प्रिन्सेस क्रुझवरील 2 भारतीय कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जपानमधील भारतीय दूतावासाने दिली आहे. ज्यांच्या रक्ताचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारतीय दूतावास जपानच्या क्रुझवरील या भारतीयांच्या संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्रालय या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितलं. गेल्या आठवड्यात हे क्रुझ जपानच्या किनाऱ्यावर पोहोचलं, या क्रुझमधून हाँगकाँगमध्ये 25 जानेवारीला उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाव्हायरस असल्याचं 2 फेब्रुवारीला समजलं. त्यानंतर जपान सरकारनं या क्रुझमधून कुणालाही बाहेर पडण्यास प्रतिबंध केला आणि या क्रुझला वेगळं ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर क्रुझवर अडकलेल्या भारतीयांनी 'आम्हाला वाचवा' अशी आर्त हाक, पंतप्रधान मोदींना घातली. क्रू मेंबर्सनी सोशल मीडियावर (social media) व्हिडिओ शेअर केला होता. हेदेखील वाचा -  PM मोदींना मदतीसाठी आर्त हाक घालणाऱ्या त्या जपानी क्रुझवरील भारतीयांना 'कोरोना' चीनमध्ये कोरोनाचे 1,367 रुग्ण भारतातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे, तर दुसरीकडे चीनमधील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. एका दिवसात (गुरुवारी) कोरोनाव्हायरसमुळे 254 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता 1,367 झाली आहे.  आतापर्यंत 60,000 रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. हेदेखील वाचा - भयंकर ! कोरोना फुफ्फुसांची अक्षरश: लावतोय वाट;  X-ray पाहाल तर बसेल धक्का
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या