मराठी बातम्या /बातम्या /देश /

लस येण्यापूर्वी भारताला दिलासा! Corona ची 5 महिन्यांतली नीचांकी संख्या

लस येण्यापूर्वी भारताला दिलासा! Corona ची 5 महिन्यांतली नीचांकी संख्या

काही दिवसांत कोरोना लस येणार असल्याची बातमी असतानाच आणखी एक दिलासा मिळाला आहे. Coronavirus च्या साथीचं देशभरातलं चित्र पाहा एका क्लिकवर.

काही दिवसांत कोरोना लस येणार असल्याची बातमी असतानाच आणखी एक दिलासा मिळाला आहे. Coronavirus च्या साथीचं देशभरातलं चित्र पाहा एका क्लिकवर.

काही दिवसांत कोरोना लस येणार असल्याची बातमी असतानाच आणखी एक दिलासा मिळाला आहे. Coronavirus च्या साथीचं देशभरातलं चित्र पाहा एका क्लिकवर.

    नवी दिल्ली, 8 डिसेंबर : देशात कोरोनाबाधितांच्या (corona) संख्येत सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (8 डिसेंबर 2020) सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 26,567 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 385 हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 महिन्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 4.10 टक्के केसेस ॲक्टिव्ह आहेत. 94.45 टक्के कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1.45 टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 3,83,866 रुग्ण ॲक्टिव्ह असून, 91,78,946 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1,40,958 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात 39,045 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 12,863 ने घटली आहे. तसेच 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 97,03,770 आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशभरातील 10,26,399 नागरिकांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशभरात 14,88,14,055 नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने चाचण्या करण्यात आल्या. महाराष्ट्रात 76 हजार ॲक्टिव्ह रूग्ण या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 76 हजार 852 रुग्ण ॲक्टिव्ह असून, 18,55,341 ही एकूण रुग्णांचीच संख्या आहे. यापैकी 17,30,715 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू महामारीच्या संसर्गाने आतापर्यंत 47 हजार 774 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे असं या आकडेवारीतून दिसून येत आहे.   झारखंडमध्ये अजून दोन रुग्णांचा मृत्यू झारखंड राज्यात  गेल्या 24 तासांत कोरोनाच्या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 988 झाली आहे. 179 जणांना नव्याने संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून ती 1,10,457 वर पोहोचल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट होते. अहवालानुसार, आतापर्यंत राज्यातील 1,07,710 नागरिक पूर्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय 1759 कोरोनाबाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत राज्यातील धनबाद आणि पूर्व सिंहभूममधील प्रत्येकी एक कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या 24 तासांत 1423 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,48,232 झाली आहे. सोमवारी 190 नागरिक कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 1382 रुग्णांनी होम क्वारंटाईनचा (Home quarantine)  कालावधी पूर्ण केला आहे. राज्यातील 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यात 1423 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात रायपूर जिल्ह्यातील 135, दुर्गमधील 128, राजनांदगावमधील 99, बालोदमधील 85, बेमेतरातील 41,  कबीरधाममधील21, धमतरीतील 52, बलौदाबाजारमधील 42, महासमुंदमधील 61, गरियाबंदमधील16, बिलासपूरमधील 92, रायगडमधील 102, कोरबामधील 104, जांजगीर चांपामधील 113, मुंगेलीतील 16, गौरेला पेंड्रा मरवहीमधील 9,सरगुजामधील 42, कोरियातील 27, सूरजपूरमधील 37, बलरामपूरमधील 14, जशपूरमधील 21, बस्तरमधील 21, कोंडागावमधील 37, दंतेवाडामधील 9, सुकमामधील 6, कांकेरमधील 72, नारायणपूरमधील 6, बिजापूरमधील 10 तर अन्य भागातील 5 रुग्णांचा समावेश आहे. पंजाबमध्ये सोमवारी कोरोनामुळे 19 रुग्णांचा मृत्यू पंजाबमध्ये सोमवारी कोरोनामुळे 19 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढून 4934 झाली. तसेच 620 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊन ती 1,56,839 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील 1,44,301 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील 7604 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशमध्ये सोमवारी 1307 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,15,957 वर पोहोचली. राज्यात गत 24 तासांत 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3347 झाली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे इंदौरमधील 5, भोपाळमधील 2, रतलाम, मंदसौर आणि सतना प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे इंदौरमधील सर्वाधिक 787 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भोपाळमध्ये 531, उज्जैनमध्ये 100, सागरमध्ये 144, जबलपूरमध्ये 228 आणि ग्वाल्हेरमध्ये 186 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी इंदौर जिल्ह्यात 509, भोपाळमध्ये 317, ग्वाल्हेरमध्ये 74 तर जबलपूरमध्ये 48 कोरोनाबाधितांची नोंद झाली.  तसेच मध्यप्रदेशात आत्तापर्यंत एकूण 2,15,957 कोरोनाबाधितांपैकी 1,99,167 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 13,443 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने (Health department) स्पष्ट केले. हरियाणात 1392 कोरोनाबाधितांची नोंद;23 जणांचा मृत्यू हरियाणात सोमवारी 1392 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून 2,45,288 वर पोहोचली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने (Health Department ) दिली. राज्यात आणखी 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढून 2611 झाली आहे. राज्यात 12,126 रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.99 टक्के आहे. राज्यात नव्याने नोंद झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये गुरुग्राममधील 356 तर फरिदाबादमधील 280 जणांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये 998, केरळमध्ये 3272 तर आंध्र प्रदेशात 316 नव्या रुग्णांची नोंद कर्नाटकमध्ये सोमवारी 998 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला. केरळमध्ये 3272 तर आंध्र प्रदेशात 316 कोरोनाबाधितांची नोंद झाली.  कर्नाटक राज्य आरोग्य विभागाच्या ( Health Department ) बुलेटिननुसार राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 8,94,004 पर्यंत पोहोचली आहे. सोमवारी 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 11867 झाला आहे. राज्यातील 24,767 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. केरळमध्ये सोमवारी 3272 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 6,39,664 वर पोहोचला आहे. सोमवारी राज्यातील 23 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 2441 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिली.  नव्याने आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये 36 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केरळमध्ये 59,467 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आंध्र प्रदेशमध्ये गेल्या पाच महिन्यांच्या तुलनेत सोमवारी सर्वात कमी म्हणजेच 316 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,72,288 वर पोहोचली आहे. आंध्र प्रदेश सरकारने प्रसिध्द केलेल्या बुलेटिननुसार राज्यात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या वाढून 7038 झाली आहे. राज्यातील 5626 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गोवा राज्यात सोमवारी 90 कोरोनाबाधितांची नोंद गोवा राज्यात सोमवारी 90 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊन ती 48,776 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 701 वर पोहोचली आहे. राज्यातील एकूण 46,778 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून 1297 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 3,60,920 नमुने तपासणी झाली आहे. बिहारमध्ये गेल्या 24 तासांत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोमवारी मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 1297 झाली. त्याचबरोबर राज्यात सोमवारी 585 कोरोनाबाधितांची नोंद झाली. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,39,565 झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बांका आणि रोहतास जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 1,10,413 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. 679 जण कोरोनामुक्त झाले असून 5150 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 97.31 टक्के आहे. गुजरातमध्ये सोमवारी 1380 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ती 2,20,168 झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या वाढून ती 4095वर पोहोचली असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गुजरातमधील 1568 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत राज्यातील 2,01,580 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत 68,868 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत राज्यात 83,10,558 नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून, 14,493 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राजस्थानमध्ये सोमवारी 1927 कोरोनाबाधितांची नोंद झाली. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,82,512 झाली आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या 24 तासांत राज्यात 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 2448 झाली आहे. सोमवारी राज्यातील जयपूर, जोधपूरमधील प्रत्येकी 4, अजमेरमधील 2, भरतपूर, भीलवाडा, बिकानेर,डूंगरपूर, नागौर, सीकर आणि उदयपूरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत जयपूरमधील 459,जोधपूरमधील 257, अजमेरमधील200, बिकानेरमधील164, कोटामधील147, भरतपूरमधील 114, उदयपूरमधील 105 आणि पालीमधील 95 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यातील 2664 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत राज्यातील एकूण 2,58,393 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील 21,671 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यातील जयपूरमध्ये 475, जोधपूरमध्ये 203, कोटामध्ये 137, भरतपूरमध्ये 96, नागौरमध्ये 89 आणि उदयपूरमध्ये 84 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कोरोमामुळे 9 जणांचा मृत्यू; त्रिपुरात 6 नव्या रुग्णांची नोंद जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी 280 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या वाढून ती 1,13,288 वर पोहोचली आहे. त्रिपुरामध्ये सहा नव्या रुग्णांची नोंद झाली तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जम्मू –काश्मीरमध्ये 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृत्यूमुखी पडलेल्यांचा एकूण आकडा 1755 वर पोहोचला असल्याची माहिती आधिकाऱ्यांनी दिली. राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रशासित क्षेत्रात5055 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. त्रिपुरात गेल्या 24 तासांत 6 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या वाढून 32,897 वर पोहोचली आहे. त्रिपुरा आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांचा एकूण आकडा वाढून 370 वर पोहोचला आहे. त्रिपुरातील 417 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या