महाराष्ट्र आणि गुजरातची चिंता वाढली, कोरोनाबाबत समोर आली नवी आकडेवारी

महाराष्ट्र आणि गुजरातची चिंता वाढली, कोरोनाबाबत समोर आली नवी आकडेवारी

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन प्रमुख राज्यांत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने घातक रूप धारण केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 एप्रिल : भारतातील कोरोना विषाणूंच्या हल्ल्याची पहिली सुरुवात दक्षिण भारतातील केरळ आणि कर्नाटकसारख्या राज्यांत झाली. मात्र आता पश्चिम भारतातातील महाराष्ट्र आणि गुजरात या दोन प्रमुख राज्यांत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने घातक रूप धारण केले आहे. भारतातील कोरोना रूग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये जवळपास 41 टक्के रुग्ण आहेत.

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह उत्तर भारतातील सहा प्रमुख राज्यांमधील रुग्ण संख्या एकट्या महाराष्ट्राच्या रूग्णांच्या संख्येच्या जवळपास आहे. त्यामुळे या दोन सर्वात मोठ्या औद्योगिक राज्यांना याचा फटका बसला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील दोन मोठ्या औद्योगिक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण जवळपास 13 हजारापर्यंत पोहचत आहे. यापैकी 8 हजारापेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये जवळपास साडेतीन हजार आहेत.

गुजरातमधील 1 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हा केरळमध्ये कोरोना व्हायरसच्याच्या एण्ट्रीला अडीच महिने झाले होते. मात्र जवळपास 40 दिवसाच्या लॉक डाऊनमध्ये या दोन राज्यातील प्रकरणे जवळपास 90 टक्के वाढली. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली आणि हरियाणा ही उत्तर भारतातील सहा सर्वाधिक कोरोना बाधित राज्ये असून त्यामध्ये आठ हजारापेक्षा जास्त प्रकरणे आहेत.

हेही वाचा - EXCLUSIVE : ...आणि पुण्यात अख्ख्या पोलीस स्टेशनचा जीव भांड्यात पडला!

30 कोटी लोकसंख्या असलेल्या तीन राज्यांनी म्हणजे राजस्थान, दिल्लीची कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे . सोबतच उत्तर प्रदेशही संख्येच्या जवळ आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबमध्ये एकही शहर नाही ज्यामध्ये 30 टक्क्यापेक्षा जास्त प्रकरणे आढळून आली आहेत.

बंगाल, बिहार आणि झारखंड ही देशाच्या पूर्व भागात तीन सर्वात जास्त प्रभावित राज्ये असून त्यापैकी बंगाल चिंतेचे कारण आहे. गेल्या 18 मार्च रोजी देशात लॉकडाऊन घोषित होण्याच्या काही दिवसांपूर्वी पहिली घटना समोर आली होती. मात्र गेल्या 40 दिवसांत या संख्येत वाढ झाली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 29, 2020, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading