मुंबई, 08 ऑगस्ट: देशात कोरोनाचा दिवसेंदिवस धुमाकूळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 61 हजार 537 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 88 हजार 612 वर पोहोचला आहे.
देशात कोरोनामुळे 933 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांचा आकडा 42 हजार 518 वर पोहोचला आहे. 6 लाख 19 हजार 088 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. आतापर्यंत 14 लाख 27 हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
भारत में पिछले 24 घंटों में #COVID19 के 61,537 मामले सामने आए हैं और 933 मौतें हुई हैं। कुल पॉजिटिव मामलों की संख्या 20,88,612 हो गई है, जिसमें 6,19,088 सक्रिय मामले, 14,27,006 ठीक / डिस्चार्ज / विस्थापित और 42,518 मौतें शामिल हैं : स्वास्थ्य मंत्रालय pic.twitter.com/6JGIAf5SyC
— ANI_HindiNews (@AHindinews) August 8, 2020
मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 48900 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. 15 जूनपर्यंत 51. 08 रिकव्हरी रेट होता त्यापैकी 7 ऑगस्टपर्यंत तो वाढून 67.98 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात 25 लाख 69 हजार 645 लोकांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी शुक्रवारी 10 हजार रुग्णांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.1 ऑगस्ट- 57,118
2 ऑगस्ट- 54,735
3 ऑगस्ट- 52,972
4 ऑगस्ट-52,050
5 ऑगस्ट- 52,509
6 ऑगस्ट- 56,282
7 ऑगस्ट- 62,538
1 ऑगस्टला 57 हजार कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 6 ऑगस्टला 56 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी तब्बल 62,538 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms